काश्यप मातंग : हा मध्य भारतातील एक बौद्ध भिक्षू इ.स.सु.६१-६२ मध्ये चीनचा सम्राट मिंगती ह्याच्या निमंत्रणावरून काश्यप मातंग आणि त्याचा एक साहाय्यक धर्मरक्षक (धर्मरत्न ?) हे चीनमध्ये गेले आणि तेथे धर्मोपदेशाचे काम करून त्यांनी भारतीय बौद्ध ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरू केले. काश्यप मातंगाने एका बेचाळीस कलमी सूत्राचे चिनी भाषेत भाषांतर केले. ह्या भिक्षूंनी आपल्याबरोबर पांढऱ्या घोड्याचा पाठीवर अनेर ग्रंथ भारतातून नेले.  ह्या गोष्टींचे स्मारक म्हणून राजाज्ञेने ज्या मठात हे भिक्षू राहात होते, तेथे पांढऱ्या घोड्याचा पुतळा उभारला आहे. त्या मठाला `पांढऱ्या घोड्याचा मठ’ म्हणून संबोधिले जाऊ लागले.

बापट, पु. वि.