कालका : पंजाबमधील अंबाला जिल्ह्यातील अंबाल्यापासून ६४ किमी.वरील कालीदेवीचे प्राचीन स्थान. कालिका या नावाचे अपभ्रष्टरूप आहे. हे हिमालय पर्वतरांगेच्या पायथ्याशी सु. ७३० मी. उंचीवर दिल्ली–अंबाला रेल्वेमार्गावर वसले आहे. येथून कालका–सिमला रेल्वेफाटा सुरू होतो. पार्वतीच्या शरीरातून कौशिकी देवी निघाल्यामुळे पार्वतीचे कृष्णवर्णीय शरीर येथे कालिका देवीच्या रूपाने स्थिरावले आहे, अशी स्थानिक समजूत आहे. 

जोशी, चंद्रहास