कार्सन सिटी : अमेरिकेतील नेव्हाडा राज्याची राजधानी. लोकसंख्या १५,४६८ (१९७०). हे राज्याच्या पश्चिम भागात, ताहो सरोवर व कार्सन पर्वत यांच्याजवळ व रेनोच्या दक्षिणेस ३८ किमी. असून, समुद्रसपाटीपासून १,४२१ मी. उचंवर आहे. हे लोहमार्ग व व्यापार यांचे केंद्र असून हयांच्या आसंमतात चांदीच्या खाणी आहेत. गुरांचे मांस व दारू गाळणे हे दोन मोठ उद्योग येथे आहेत. येथे पूर्वी सरकारी टांकसाळ होते, हल्ली राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय, सर्वोच्च न्यायालय व राज्य ग्रंथालय यांच्या इमारती आहेत.
लिमये, दि. ह.