कँबेल, सर कोलिन क्लाइड: (२० ऑक्टोबर १७९२—१४ ऑगस्ट १८६३). कर्तृत्ववान ब्रिटिश सेनानी. १८४२ मध्ये चीनशी झालेल्या अफू-युद्धात याने आधिपत्य केले होते. १८४९ मधील शिखांशी झालेल्या युद्धात विशेष कामगिरी केल्याबद्दल याला ‘सर’ पदवी मिळाली. १८५४ च्या  क्रिमियन युद्धात याने रशियाचा बॅलाक्लाव्हावरील हल्ला परतवून लावला. भारतातील १८५७ च्या  उठावाच्या वेळी हा सैन्यप्रमुख होता. त्यावेळी याने केलेल्या कामगिरीबद्दल याला ‘बॅरन’ पदवी मिळाली होती. 

चाफेकर, शं. गं.