कपिलाषष्ठी : भाद्रपद कृष्ण षष्ठीच्यदिवशी मंगळवार, चंद्रनक्षत्र रोहिणी, सूर्यनक्षत्र हस्त आणि व्यतीपात हे योग जुळून आल्यास, या दिवसाला कपिलाषष्ठी म्हणतात. साठ वर्षांनी एकदा हा योग येतो म्हणून धार्मिक दृष्टीने ह्या योगास फार महत्त्व आहे. या दिवशी सूर्यपूजा करून कपिलाधेनूचे दान करावे तसेच श्राद्ध-दानादी कृत्ये करावीत, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.  

जोशी, रंगनाथशास्त्री