कनिंगहॅम, सरआर्थर : (१९ जानेवारी १८९५ — ३० जानेवारी १९४८). ब्रिटिश हवाई युद्ध-तज्ञ. न्यूझीलंडच्या भूदलात १९१४ मध्ये प्रवेश. १९१६ मध्ये हा विमानदलात शिरला. १९२५ मध्ये कैरो ते नायजेरिया उड्डाणाबद्दल विशेषपदक व १९४१ मध्ये एअर व्हाइस मार्शलचा हुद्दा यास मिळाला. १९४० – ४२ मधील आफ्रिका युद्धात दोस्त सैन्याला विमानी संरक्षण देण्याच्या महत्त्वाच्या कामगिरीचे नेतृत्व याच्याकडे होते. १९४३ – ४४ मध्ये भूमध्य समुद्रावर रणनैतिक वायुदलाचा हा प्रमुख होता. नॉर्मंडीच्या स्वारीतही याचा महत्त्वाचा भाग होता.

टिपणीस, य. रा.