कंपली : कर्नाटक राज्याच्या बेल्लारी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ. लोकसंख्या १९,९१७ (१९७१). हे बेल्लारीच्या वायव्येस ४५ किमी., तुंगभद्रेच्या काठी असून पूर्वी होस्पेट तालुक्याचे ठाणे होते. अकराव्या शतकात चालुक्यांच्या एका मांडलिकाची ही राजधानी होती. तेव्हाचे प्राचीन अवशेष तुंगभद्रेकाठी अजून दिसतात. उंचावरच्या पेटा विभागात गावाची मुख्य वस्ती असून, भोवताली चौफेर पाटाच्या पाण्यावरची शेती आहे. तांदूळ सडण्याच्या गिरण्या, बांबूच्या होड्या व तट्टे विकणे आणि केळ्याच्या बागा हे येथील मुख्य उद्योग आहेत.

ओक, शा. नि.