कटोल : नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसिलीचे ठिकाण. लोक संख्या १९,२३६ (१९७१). हे जाम नदीकाठी, नागपूर – इटारसी लोहमार्गावर नागपूरपासून ६५ किमी. आहे. महाभारतकालीन कुंतलनगर हेच असावे. येथील जुना पडका किल्ला व भवानीचे प्राचीन मंदिर प्रेक्षणीय आहे. कापूस व संत्री यांसाठी काटोल प्रसिध्द आहे.

जोशी, चंद्रहास