संलेखन : संलेखन वा संलेखना म्हणजे कृश करणे. शरीराबरोबर विकारही कृश करून देहत्याग करण्याचे हे व्रत आहे. जैन साधूप्रमाणे जैन गृहस्थही हे व्रत आचरू शकतो. उपसर्ग, रोग, वार्धक्य किंवा दुर्भिक्ष्य ह्यांपैकी एखादे संकट आल्यास जैन श्रावक किंवा साधू क्रमाक्रमाने अन्नपाण्याचा त्याग करून मरण पतकरतो. धर्माची अनुमती असलेले हे मरण होय. हे कृत्य राग, द्वेष किंवा मोहाच्या आधीन होऊन केलेले नसल्यामुळे त्यात जीवनाश असला, तरी हिंसा नाही, असे मानले जाते.

पाटील, भ. दे.