शंखपुष्षी : (विष्णुक्रांता, शंखवल्ली गु. काली शंखवल्ली, झिंकीफुदर्दी क. विष्णुक्रांती हि. श्यामक्रांता, शंखपुष्पी सं. लघुविष्णुक्रांता, नीलपुष्पी लॅ. इव्हॉल्व्ह्युलस अँल्सिनॉइडिस, कॉंव्हॉल्व्ह्युलस अँल्सिनॉइडिस, कुल-कॉन्हॉल्व्ह्युलेसी). ह्या बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधी प्रदेशांत आढळतो. हिची शारीरिक लक्षणे, औषधी गुणधर्म व इतर उपयोग “नीलपुष्पी” या नोंदीत दिलेले आहेत. कॅंस्कोरा डेकसेटा ही वनस्पतीही कधीकधी शंखपुष्पी या नावाने ओळखली जाते.

जमदाडे, ज. वि.