रंगद्रव्ये, वनस्पतींची : बहुतेक सर्व वनस्पती आपल्या पानांच्या हिरव्या रंगाने आपले अस्तित्व व अन्ननिर्मितीतील महत्त्व सिद्ध करतात तसेच फुले व फळे यांच्या विविध रंगांनी स्वतःची शोभा वाढवितात आणि परिसरही आल्हाददायक करतात. फुले व फळे यांतील रंगांच्या साहाय्याने स्वतःची पुनरुत्पत्ती त्या विविध प्राण्यांकडून साध्य करून घेतात व आपले जातिसातत्य राखतात. सकृत्दर्शनी त्यांनी केलेली रंगांची उधळण आवश्यक वाटली नाही, तरी त्यांच्या क्रमविकासात (उत्क्रांतीत) रंगांना बरेच महत्त्व मिळाले असून मनुष्यमात्राने वनस्पतींतील रंगद्रव्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे हे निश्चित यासंबंधी अधिक तपशील ‘रंजन, जैव’ या नोंदीत दिलेला आहे.
घन, सुशीला प.