मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ : राजस्थान राज्यातील एक विद्यापीठ. ‘उदयपूर विद्यापीठ’ (स्था. १९६३) या नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री कै. मोहनलाल सुखाडिया यांच्या स्मरणार्थ १९८३ मध्ये नामांतर करण्यात आले. नियामक मंडळ आणि कार्यकारी समिती रद्द होऊन त्या जागी व्यवस्थापन मंडळ स्थापण्यात आले आहे. कृषी व शिक्षणशास्त्र ह्या शाखांतील महाविद्यालयांसाठी वेगवेगळ्या स्वतंत्र विद्यापरिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत.

 

विद्यापीठात एकूण ७,९५३ विद्यार्थी शिकत होते. (१९८३–८४). विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात ८६,९५३ ग्रंथ व २२० नियतकालीके होती (१९८३–८४). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न सु. १०·०० कोटी रु. व खर्च १०·९२ कोटी रु. होता.

पहा : उदयपूर विद्यापीठ.

मिसार, म. व्यं.