मुरगाब : अफगाणिस्तानातील एक नदी. लांबी ३८५ किमी. हिचा उगम पॅरोपामिसस पर्वतात होऊन ती ईशान्येस मारी मरूद्यानातून रशियाकडे वाहत जाते आणि काराकुम वाळवंट व ईशान्येकडील तुर्कमान (एस्. एस्. आर्.) प्रदेशात लुप्त होते. ह्या नदीमुळे अफगणिस्तान व रशिया यांच्या सीमा निश्चित झालेल्या आहेत. कुशी नदीस ही नदी मिळते. तीपासून बनलेल्या प्रवाहावर तश्किप्रीस्टोरी व लोलोतान येथील धरणे उभारलेली असून शेतीला पाणीपुरवठा करण्यास त्यांचा उपयोग होतो.

मिसार, म.व्यं.