भापारा : भारतातील प. बंगाल राज्याच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील शहर. लोकसंख्या २, ७०,१०८ (१९८१). हे कलकत्त्याच्या उत्तरेस सु. ३७ किमी. हुगळी नदीकाठी वसलेले आहे. संस्कृत भाषावाङमयाचे एक प्रमुख शिक्षण केंद्र म्हणून यास विशेष महत्व होते. रस्ते, लोहमार्ग यांनी हे कलकत्ता शहराशी जोडलेले आहे. प्रथम या शहराचा समावेश नैहाटी नगरपालिकेत करण्यात आलेला होता परंतु १८९९ पासून येथे स्वतंत्र नगरपालिका आहे. प. बंगाल राज्यातील एक औद्योगिक केंद्र म्हणून यास महत्त्व असून येथे कागद, ताग, कापड, भात सडणे इ. उद्योगांचा विकास झालेला आहे.

गाडे, ना. स.