बूटल्येरॉव्ह, अल्यिक्सांदर म्यिखायलव्ह्यिच : ६ सप्टेंबर १८२८-१७ ऑगस्ट १८८६). रशियन रसायनशास्त्रज्ञ. रसायनशास्त्रातील संरचना सिध्दांताविषयीच्या, विशेषतः चलसमघटकतेविषयीच्या [दोन अथवा अधिक समघटक-ज्यांच्या रेणूतील घटक-अणू तेच व त्याच प्रमाणात असतात अशी संयुगे-स्वयंप्रेरणेने आपली रूपे आपापसात बदलणाऱ्या व कोणत्याही क्षणी ही रूपे एकत्र व समतोलावस्थेत असण्याच्या (कझॅन, रशिया) येथे व शिक्षण कझॅन येथे झाले. १८४९ साली पदवी मिळविल्यावर त्यांनी १८६८ पर्यंत कझॅन विद्यापीठात अध्यापनाचे काम केले. रसायनशास्त्रातील संशोधनाद्वारे त्यांनी मास्टर व डॉक्टरेट (१८५४) या पदव्या संपादन केल्या, तसेच कीटकविज्ञानातील संशोधनामुळे त्यांना निसर्गविज्ञानातील पदवीही मिळाली होती. १८६८ पासून १८८५ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत ते सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतरही त्यांनी रसायनशास्त्राविषयीची काही खास व्याख्याने दिली होती.  

 

 व्हूत र्स प्रयोगशाळेत त्यांनी संशोधनास सुरुवात केली. त्यांनी मिथिलीन आयोडाइड हे संयुग एका नवीन पद्धतीने तयार केले आणि त्याच्या व त्याच्या अनुजातांच्या (त्यापासून बनविलेल्या इतर संयुगांच्या) विक्रियांचा अभ्यासही त्यांनी केला. त्यातूनच त्यांना हेक्झॅमिथिलीन टेट्रामाइन व फॉर्माल्डिहाइडाच्या बहुवारिकाचा 

परिस्थितीविषयीच्या ⟶ समघटकता] प्रगतीस त्यांच्या संशोधनामुळे मदत झाली. त्यांचा जन्म चीस्तॉपल

लागला. या बहुवारिकावर चुन्याच्या निवळीची विक्रिया केली असता त्यांना शर्करायुक्त पदार्थ मिळाला. यामध्ये आल्फा ॲक्रोज (C6H12O6) ही शर्करा असल्याचे पुढे एमील फिशर यांनी सिद्ध केले. हे शर्करेचे पहिले संश्लेषण (कृत्रिम रीतीने झालेली निर्मिती) समजले जाते. फॉर्माल्डिहाइड व तृतीयक

अल्कोहॉले [-c-OH गट असणारी अल्कोहॉले ⟶अल्कोहॉल]

यांचे संश्लेषण त्यांनीच प्रथम केले. यांशिवाय त्यांनी विविध कार्बनी संयुगांचा विशेष अभ्यास केला व बहुवारिकीकरणाच्या (लहान रेणूंपासून बहुवारिक बनविण्याच्या) विक्रियेचे अनुसंधान केले. तसेच त्यांनी असंपृक्त कार्बनी संयुगांमध्ये व्दिबंध किंवा त्रिबंध असतात हे शोधून काढले (१८८८). त्यांनी मधमाश्या, फुलपाखरे इ. कीटकांचा अभ्यास करून अनेक लेखही लिहिले.

अणूंचे प्रकार व त्यांची संख्या यांच्याप्रमाणेच त्यांच्या मांडणीवरूनही रेणूचे रासायनिक स्वरुप ठरते, असे त्यांनी दाखवून दिले (१८६१). अशा तऱ्हेने कार्बनी रसायनशास्त्रातील संरचनेची मूलभूत संकल्पना त्यांनी निश्चित रूपात मांडून संरचना सिध्दांतविषयक विचार प्रगत करण्याची बहुमोल कामगिरी केली. संरचना सिध्दांतविषयक लिहिलेल्या पाठ्यपुस्तकात त्यांनी या संकल्पनेची ओळख करून दिली आहे.१८६४ साली त्यांनी रेणुसूत्र एकच असलेले ब्युटेनाचे दोन तर पेंटेनाचे तीन प्रकार असल्याचे विशद केले. संयुगात अणू एकमेकांस कसे जोडले गेले आहेत, ते दाखविणाऱ्या संरचना सूत्रांनी हे प्रकार वेगळे असल्याचे दाखविले जाते. १८६६ मध्ये त्यांनी आयसोव्युटेन या प्रकाराचे संश्लेषणही केले.

 सेंट पीटर्झबर्ग ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, रशियन केमिकल सोसायटी तसेच पॅरिस, जर्मन, लंडन, चेक व अमेरिकन केमिकल सोसायट्या यांचे सदस्यत्व, कझॅन विद्यापीठाचे कुलमंत्री पद (रेक्टर) (१८६० व १८६३) वगैरे बहुमान त्यांना मिळाले होते. ते बीअरिटस (रशिया) येथे मृत्यू पावले.

फाळके, धै.शं.