बाटा नगर : पश्चिम बंगाल राज्याच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र. लोकसंख्या २॰,३५५ (१९८१). येथील बाटा कंपनीला पादत्राणे आणि चामडयाच्या वस्तू बनविण्याचा कारखाना प्रसिद्ध असून त्यावरूनच ‘बाटानगर’ हे नाव देण्यात आले. यांशिवाय शिवणयंत्रे, विद्युत् उपकरणे इ. उद्योगही येथे विकसित झालेले आहेत.

कापडी, सुलभा.