मयाळ : (१) फुलोर्‍यासह फांदी, (२) नर-फूल, (३) स्त्री-फूल, (४) फळे असलेली फांदी.मयाळ : (मायाळू, वेलबोंडी हिं. व वं. पोई, गु. पोथीनी वेल, क. केंपुबसाले, सं. उपोदकी, पूतिका, इं. इंडियन स्पिनॅक, लॅ बॅसेला रूब्रा, कुल-बॅसेलेसी). ही बहुवर्षायू( अनेक वर्षे जगणारी) लाल अथवा हिरव्या रंगाची दक्षिणावर्ती (उजव्या बाजूस वेढे देत चढणारी) ⇨महालता (मोठी वेल) रसाळअसून भारतात सर्वत्र,तसेच आशियात व आफ्रिकेत उष्ण प्रदेशांत आढळते. हिची पाने साधी, एकाआड एक, ५-१२.५ २.५-७.५ सेंमी.,

पिंगट,जाडसर, अंडाकृती व टोकदार असतात. ऑक्टोबर ते डिसेंबरात हिला कणिस [⟶ पुष्पबंध] प्रकारचे फुलोरे येतातव त्यांवर द्विलिंगी, विनदेठाची, लाल फुले आसतात[⟶ फूल]. शुष्कफळ वाटाण्याएवढे, लाल किंवा काळे असून त्यावर मांसल परिदलांचे (बाहेरील पुष्पदलांचे )

काहीशी आवरण असेत. फळांची साल पातळ असून ती बीजाभोवती चिकटून राहते, बी एकच खरबरीत असते. हिची इतर शारिरीक लक्षणे ⇨बॅसेलेसीत (मयाळ कुलात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. पांढरी फुले, लालसर किंवा गर्द हिरवी पाने, पांढरे खोड व फळे असे अवयव असलेले प्रकार (बॅ. आल्बा, बॅ. कॉर्डिफोलिया ) आढळतात.

हिचा उपयोग मुख्यत : भाजिकरिता करतात. चीनमध्ये लाल देठापासून रंग काढतात, त्यात थोडा लिंबाचा रस घालून रंगविण्यास वापरतात. फळातील जांभळा रंगही अन्नपदार्थ रंगविण्यास वापरतात. मयाळाची भाजीसशीतल पित्तशामक असते. पाने शामक (शांत करणारी), व मूत्रल (लघवी साफ करणारी) असून ती परमा व शिशनाग्रदाह यांवर उपयुक्त असतात. पानांचा चोथा गळवे व केसतूट यांवर बाधल्यास ही लवकर पुवाळतात. भाजणे व पोळणे यांवर पानांच्या रसात लोणी घालून लावल्यास आग कमी होते. वनस्पतीचा रस डोकेदुखीवर देतात. अग्निमांद्यामुळे अंगावर पित्त उठल्यास पानांचा रस लावतात, मुले व गर्भशय मलावरोधावर हा रस पिण्यास देतात.

पाटील, शा. दा.

डोंगरळ भाग वगळता भारताच्या सर्व भागांत या वेलीची भाजीसाठी लागवड करतात. लाल आणि हिरव्या पानांचे प्रकार प. बंगाल, आसाम व दक्षिण भारतात लागवडीत आहेत. हिरव्या पानांचे प्रकार विशेषकरून उत्तर प्रदेश आणि पंजाबात आढळून येतात. या वेलीची लागवड मुळांचे अथवा खोडाचे तुकडे लावून अथवा बी पेरून पावसाळ्याच्या सुरूवातीला करतात. गारवा असलेल्या जागेत सुपीक व चांगल्या निचर्‍याच्या जमिनीत वेल चांगली वाढते. योग्य वाढीसाठी बांबू अगर अशा प्रकारचा आधार द्यावा लागतो. लागणीपासून ८०-९- दिवसांनंतर पाने व कोवळे देठ भाजीसाठी तोडतात.

चौधरी, रा. मो.

संदर्भ: C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. I. Delhi, 1948