मध्यकाष्ठ : वृक्ष जून ⇨जीर्ण) झाले किंवा वयाने वाढू लागले म्हणजे त्यांच्या अंतर्भागात विशिष्ट बदल

ओक वृक्षाच्या खोडाचा आडवा छेद : ( १ ) साल, ( २ ) रसकाष्ठ, ( ३ ) मध्यकाष्ठ.

होऊन मध्य भागातील लाकूड कठीण बनते, त्याला मध्यकाष्ठ म्हणतात. हे गडद रंगाचे असल्यामुळे बाहेरील रसकाष्ठापासून [काष्ठमय वनस्पतीमध्ये प्रकाष्ठाच्या म्हणजे जलीय विद्राव वाहून नेणार्‍या व आधार देणार्‍या ऊतकाच्या ⇨समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या –पेशींच्या-समूहाच्या ) सर्व पृष्ठभागावर नव्याने तयार झालेल्या द्वितीयक काष्ठाच्या थरापासून] हे वेगळे ओळखता येते. ⇨ऑक्सिडीभवन व बहुवारिकीकरण [अनेक लहान रेणूंच्या संयोगाने प्रचंड रेणू असलेले संयुग बनण्याची क्रिया ⟶ बहुवारिकीकरण] या क्रियांमुळे कोशिकेमधील पिष्ठमय पदार्थ नाहीसे होतात आणि कोशिकांवर असलेली एंझाइमांची [जीवरासायनिक विक्रीया घडविण्यास मदत करणार्‍या प्रथिनांची ⟶ एंझाइमे] नियंत्रण शक्ती कोलमडते. परिणामी या मध्यकाष्ठ भागात रंगयुक्त द्रव्यांची निर्मिती होते. काळा अक्रोड, सागवान, रेड सीडार व रेडवुड यांचे मध्यकाष्ठ रंगाच्या गर्दपणामुळे सुस्पष्ट दिसते. तर फर, स्प्रूस ,बहावा यांमध्ये मध्यकाष्ठ व रसकाष्ठ यांच्या रंगछटांमधील भेद कमी असतो. किंवा अजिबात नसतो.

मूलतः मध्यकाष्ठ हे काष्ठ ऊतक निर्जीव झाल्यानंतर तयार होते. काष्ठ ऊतकात प्राथमिक व द्वितीयक असे दोन प्रकार असतात. प्राथमिक काष्ठ ऊतक व द्वितीयक काष्ठ ऊतक यांमध्ये फरक करणे तसे अवघड असते. परंतु हा फरक दोन्ही काष्ठ ऊतकांमध्ये असलेल्या वाहिका घटकांच्या ⇨पाण्याचे वहन करणार्‍या व काष्ठात आढळणार्‍या तीक्ष्ण टोकांच्या लांबट घटकांच्या ) उंचीवरून समजू शकतो. द्वितीय काष्ठ ऊतकात प्रथमोदभव काष्ठ कोशिकांची उंची ही प्राथमिक काष्ठ ऊतकात असलेल्या अनुलिप्त ⇨सभोवार कडे असलेल्या) वाहिका घटकांपेक्षा बरीच कमी असते.

द्वितीयक काष्ठ ऊतकांचे प्रमुख लक्षण म्हणजे त्यातं असलेल्या कोशिकांच्या मांडणीतील दोन प्रकार हे होय. यांमध्ये एक उभी मांडणी व दुसरी आडवी मांडणी असते. आडव्या मांडणीत प्रकाष्ठ किरण [वाहक किरणांचे ⇨जलीय विद्राव क्षितिजसमांतर दिशेत वाहून नेण्यासाठी खोड व मुळे यांत असलेले अरीय-त्रिज्यीय-मांडणीच्या थरांचे) प्रकाष्ठातील भाग] असतात, तर उभ्या मांडणीत काष्ठ ⇨मृदूतक, वाहिका घटक व तंतुकोशिका यांचा अंतर्भाव असतो. द्वितीयक काष्ठ ऊतकाचा बाहेरील भाग हा सजीव कोशिकांचा बनलेला असतो आणि त्यातील काही कोशिका जलवहनाचे कार्य करतात. बाहेरील हा भाग रसकाष्ठ या नावा ने ओळखला जातो. तो अन्नसंचयाचे कार्यही करतो. रसकाष्ठ जास्त प्रमाणात असणार्‍या वृक्षांचे मध्यकाष्ठ रंगयुक्त नसते. त्यामुळे त्यांच्या खोडांचे आडवे छेद एकसारख्या रंगाचे दिसतात.

बहुतेक झाडांमध्ये द्वितीयक काष्ठ ऊतकाचा आतील भाग जलवहनाचे कार्य पूर्णतः थांबवितो. त्या भागातील सजीव कोशिका मृत होतात आणि त्या क्रियेबरोबरच त्यातील कोशिका द्रव्याचे विघटन ⇨घटक द्रव्य अलग होण्याची क्रिया) होऊन कोशिकारस ⇨कोशिकेचे द्रायुरूप-द्रव व वायुरूप –घटक) कमीकमी होत जातो. वाढत्या वयाबरोबर काष्ठातील पाणी व संग्रहित अन्नद्रव्याचा साठा कमी होतो. काष्ठ ऊतकातील वाहिका कोशिकांमध्ये गुहारूध ⇨मृदतकीय कोशिकांची पिशवीसारखी वाढ) तयार होऊ लागते आणि वाहिकेतील कोशिकांच्या पोकळीचा भाग बंद होतो. मृदूतक कोशिकांच्या भित्ती जास्त प्रमाणात जाड होत जातात. तेल, डिंक, रेझिने, टॅनिने इ. रंगयुक्त, तसेच अँरोमॅटिक ⇨सुंगधी) पदार्थ कोशिकेमध्ये घुसतात. या रंगयुक्त पदार्थामुळे मध्यकाष्ठाचा रंग भुरा, काळसर भुरा किंवा काळा असल्याचे दिसून येते व त्यामुळेच ते रसकाष्ठापासून सहजपणे स्पष्ट ओळखू येते. वरील बदलांमुळे मध्यकाष्ठाच्या बळकटपणावर परिणाम होत नाही. रसकाष्ठपेक्षा त्याचा टिकाऊपणा वाढतो. रोगकारक कवकांमुळे ⇨बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पतीमुळे) ते कुजत नाही व त्यात द्रव पदार्थ शिरत नाहीत. कृत्रिम परिरक्षक ⇨संरक्षक) द्रव रसायनेही त्यात शिरू शकत नाहीत. या द्रव पदार्थामध्ये तसेच वरील कार्बनी पदार्थाप्रमाणेच कॅल्शियम कार्बोनेट हे एल्म वृक्षाच्या तर चूर्णरूप सिलिका सागवानाच्या वाहिकांत बर्‍याच वेळा आढळते.

मध्यकाष्ठ व रसकाष्ठ यांची जाडी रूंदी व गुणवत्ता या बाबतीत प्रत्येक झाडात जो बदल घडतो, तो बदल ते झाड कोणत्या परिस्थितीत वाढले आहे याचा परिपाक असतो. मध्यकाष्ठ व रसकाष्ठ यांचे प्रमाण आणि दोघांमधील दिसणारा व प्रत्यक्ष असणारा फरक या बाबतीत निरनिराळ्या झाडांच्या जातीत भिन्नता आढळते. वाढीच्या भिन्न अवस्थांमुळेही या बाबतीत फरक असू शकतो. काही वृक्षांचे मध्यकाष्ठ स्पष्टपणे विभेदित झालेले ⇨कार्य विभागणीनुसार रूपांतरित झालेले) नसते ⇨उदा .फर, स्प्रूस) काहींचे रसकाष्ठ पातळ असते ⇨उदा. मोरस, टॅक्सस, रॉबिनिया वंश) व इतर काही वृक्षांचे रसकाष्ठ जाड असते. ⇨उदा. अँसर, फॅगस, फ्रॅक्सिनस वंश). कधीकधी रोगट अवस्थेमुळेही मध्यकाष्ठ निर्माण होऊ शकते.

मध्यकाष्ठ हे सामान्यतः टिकाऊ असते व ते वृक्षामध्ये पुष्कळ वर्षे कायम असते आणि कधीकधी ते वृक्षात संपूर्ण आयुष्यभर असते. तथापि काही प्रसंगी रोगराईमुळे वा त्याची निर्मिती पूर्णपणे थांबल्यामुळे त्याचा काही भाग किंवा ते संपूर्णतः कुजून जाते व वृक्षाचे खोड पोकळ होते. अशा वृक्षाची वाढ चालू राहते कारण मध्यकाष्ठ वहनाचे कार्य करीत नाही. पण ते खोडाला आधार देते. त्याचा रंग जेवढा जास्त गर्द तेवढे ते जास्त टिकाऊ असते.

मध्यकाष्ठ व रसकाष्ठ यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधानुसार वृक्षांचे पुढीलप्रमाणे प्रकार मानता येतील. ⇨१) वजनाला हलके असे मध्यकाष्ठ असणारे वृक्ष ⇨२) मध्यकाष्ठ निर्माण होण्याची प्रक्रिया खुंटलेले वृक्ष ⇨३) मध्यकाष्ठाची रंगीत होण्याची क्रिया दुसर्‍या ऊतकाकडून होणारे वृक्ष व ⇨४) मध्यकाष्ठ रंगीत असण्याची क्रिया प्रसंगोपात असणारे वृक्ष.

लाकूड धंद्यांत द्विदलिकित ⇨द्विदल) वनस्पतीचे लाकूड हे मऊ लाकूड म्हणून ओळखले जाते. परतु मऊ लाकूड व कठीण लाकूड या संज्ञा पूर्णतः लाकडाच्या कठिणपणाबाबत उपयोगात पडू शकत नाहीत कारण लाकडास मऊ व कठीण अशा दोन्ही प्रकारची ऊतके सापडतात.

संदर्भ : Esau. K. Plant Anatomy , New York, 1960.

पाटील, शा.दा.