फ्रेंच भाषा :  फ्रेंच ही पश्चिम यूरोपात बोलली जाणारी एक अत्यंत समृद्ध भाषा आहे .  तिची अभिव्यक्ती क्षमता अतिशय श्रेष्ठ दर्जाची असून तिचे साहित्य जगातील सर्व श्रेष्ठ साहित्यांपैकी एक आहे .  फ्रेंच भाषा फ्रान्सबाहेर बेल्जियम ,  स्वित्सर्लंड व लक्सेंबर्ग यांचा काही भाग आणि कॅनडाचे काही प्रांत यांत मातृभाषा म्हणून बोलली जाते .  उत्तर  आ फ्रिकेचा किनारी प्रदेश ,  इजिप्त ,  काँ गो ,  सिरीया ,  लेबानन ,  मादागास्कर इ .  पू र्वी फ्रेंच साम्राज्यातल्या किंवा फ्रेंच वर्चस्वाखाली असलेल्या प्रदेशांतही सांस्कृतिक भाषा म्हणून तिची पकड आहे .  भारतातही चंद्र नगर  ( प .  बंगाल ) ,  पाँ डिचेरी  ( केंद्र शासित ) ,  यानाआँ व माहे  ( केरळ )  या फ्रेंच वसाहतींत शिक्षण आणि राज्यकारभार यांत फ्रेंच भाषेचाच उपयोग केला जाई .

  

 फ्रेंच भाषिकांची एकंदर संख्या आठ कोटींच्या वर आहे .

  

  इतिहास  :  फ्रेंच ही इंडो – यू रोपियन भाषा – कुटुं बाच्या लॅटिन शाखेची म्हणजे रोमा न्स बोली आहे .  इ .  स .  पू . ५०  च्या सुमाराला लॅटिनचा फ्रान्समध्ये प्रवेश झाला .  सुरु वातीला सांस्कृती क पातळीवर तो शिक्षण , राज्यकारभार ,  न्यायदान या क्षेत्रांत झाला .  ही ग्रांथिक प्रमाण लॅटिन होती .  तीच पुढे ख्रिस्तीकरणानंतर धर्मभाषा म्हणूनही चालू राहि ली  परंतु सैनिक ,  व्यापारी ,  कारागी र इ त्यादीं ची लौकिक लॅटिन बोली याचबरोबर सामान्य जनतेत पसरली आणि परिवर्तने होत होत तिला आजचे स्वरूप प्राप्त झाले .

  

 फ्रेंचचा लिखि त पुरावा आठव्या शतकापासून सापडतो .  तो काही लॅटिन व जर्मानिक शब्दांचा अर्थ देणाऱ्या शब्दांच्या स्वरूपात आहे .  इ .  स . ८४२  ची ‘ स्ट्रॅस्‌बर्गची शपथ ’  ही या भाषेची खरी सुरुवात म्हणता येईल .  यानंतर धार्मिक व ऐतिहासिक स्वरूपाच्या लेखनातून नंतरचे फ्रेंच साहित्य जन्माला आले .

  

पण फ्रान्सच्या सर्व प्रदेशां तली बोली एकरूप नव्हती . तिची दक्षिणेकडील व उत्तरेकडील रूपे वेगळी असून ‘ होय ’  या अर्थाच्या प्रचलित असणाऱ्या शब्दावरून दक्षिण बोलीला ‘ ऑक ’  व उत्तर बोलीला ‘ ओइल ’  हे नाव होते .

  

  फ्रेंच भाषेला खरी प्रतिष्ठा  १५३९  मध्ये मिळाली .  या वर्षापासून राजाज्ञेने न्यायदानात आणि राज्यकारभारात तिचा वापर लॅटिन ऐवजी होऊ लागला .  पंधराव्या शतकात छापण्याच्या कलेचा शोध लागलेला होता . त्यामुळे दरबारचे आदेश ,  न्यायदान ,  राज्यकारभाराचे कागदपत्र ज्या भाषेत छापून देशभर जाऊ लागले त्या राजधानीच्या म्हणजे पॅरिसच्या स्थानिक भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला .

 विसाव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत फ्रेंच ही यूरोपातील दरबार ,  सुसंस्कृत वर्ग इत्यादीं ची व्यवहारभाषा होती .  आंतरराष्ट्रीय करारांत व वाटाघाटींत ती वापरली जाई .  पहिल्या जागतिक युद्धानंतर हे आंतरराष्ट्रीय महत्त्व कमी होऊ लागले आणि अमेरिकेच्या राजकीय वर्चस्वामुळे आता तर ही जागा इंग्रजांनी घेतली आहे .

  

भाषिक वैशिष्ट्ये  :  ध्वनीविचारासंबंधी लिहिण्यापुर्वी लिपीचा परिचय करून घेणे सोयी चे ठरेल .

  

 फ्रेंच भाषा लेखनासाठी रोमन लिपीचा वापर करते .  ही लिपी अशी  :  a b c d e f g h i j (k) l m n o p q r s t u v (w) x y z,  यांपैकी k  व w  ही अक्षरे काही परकी शब्दांतच आढळतात  ( Kepi, wagon ) . यांशिवाय संवृत स्वरदर्शक  ′ ( एग्यू ) ,  विवृत स्वरदर्शक   ‵ ( ग्राव्ह )  आणि दीर्घत्वदर्शक  ⋀  ( सिकौफ्ले क्स )  ही तीन आघातचिन्हे असून लागोपाठ येणारे स्वर वेगळे उच्चारले पाहिजेत हे दाखविणारे  .. ( त्रेमा )  हे चिन्ह आहे  ( उदा . ,  hais ए ,  पण ha ἴs  आइ ).

  

लेखनदृष्ट्या उच्चाराचे नियम पुढीलप्रमाणे  :

  

  स्वर : a  आ e अनुच्चारित ,  अ ,  ए ,  किंवा ॲ   ए   ॲ   दीर्घ् ए i इ o ओ किंवा ऑ u ओष्ठ्य इ y इ  किंवा पुढे स्वर आल्यास य ai, ay ए किंवा ॲ au ओ किंवा ऑ ei , ey ए किंवा ॲ eu ओष्ठ्य ए eau ओ oi, oy  वा ou उ .

  

 स्वरानंतर m  किंवा n  आणि त्यानंतर व्यंजन आल्यास ,  किंवा शब्दांती स्वरानंतर ही अनुनासिके आल्यास त्यांचा उच्चार होत नाही .  आधी चा स्वर मात्र अनुनासिक बनतो .  उदा . , am, an, em, en आं aim, ain, eim, ein, im, in अँ om, on आँ oin वँ um, un अनुनासिक ओष्ठ्य ए .

  व्यंजने  :  b  ब  d द  f  ( घर्षक )  फ  k क   l  ल  m म  n न  p प  r  ( तालुपटीय )  र  v  ( दंतौष्ठ्य )  व  w  ( ओष्ठ्य )  व  x क्स किंवा ग्झ  z  ( दंत्य घर्षक )  झ .

  

 c नंतर a , o, u  किंवा व्यंजन आल्यास क  e, i, y आल्यास स  h आल्यास ग्रीक शब्दात क ,  एरव्ही श  c खाली छोटा s  ( सेदिय )  असल्यास स .

  

 g नंतर a , o, u किंवा व्यंजन आल्यास ग  e, i, y आल्यास  ( तालव्य घर्षक )  झ .  नंतर e , i, y आल्यास g u चा उच्चार ग .

  

  h नेहमी अनुच्चारीत   पण ph = f  

  j  नेहमी  ( तालव्य घर्षक )  झ  

  qu = क  

  s दोन स्वरांमध्ये आल्यास  ( दंत्य घर्षक )  झ   इतरत्र स .  

  t त  – tion, tie मधे स .  

  

 ll  हे लेखन i  व स्वर यांच्यामध्ये आल्यास त्याचा उच्चार य  ( fille  फीय ‘ मुलगी ’). i पुर्वी स्वर आल्यास ill  चा उच्चार य  ( faille  फाय ).  

  

   b, d, g, j, k, p, s, t, u, w, x, z.

  

 ही व्यंजने शब्दांती अनुच्चारीत असतात .


   

  ध्वनिविचार  :  स्वर  :  आ ,  इ ,  ए ,  ॲ ,  उ ,  ओ ,  ऑ , ( ओष्ठ्य )  इ , ( ओष्ठ्य )  ए .  यांतले आ ,  ॲ ,  ऑ , ( ओष्ठ्य )  ए अनुनासिक असू शकतात .  ऱ्ह स्वदीर्घत्व अर्थनिर्णायक नाही .

  

  व्यंजने : ( स्फोटक )  क ,  ग ,  त ,  द ,  प ,  ब  ( अनुनासिके )  न ,  म  ( घर्षक )  फ ,  व ,  स ,  झ ,  श ,  झ  ( कंपक )  र  ( पा र्श्वि क )  ल  ( अर्धस्वर )  य ,  व  ( ओष्ठ्य )  य .

  

  व्याकरण :  फ्रेंचमध्ये नाम ,  सर्वनाम ,  विशेषण ,  क्रियापद ,  क्रियाविशेषण ,  उभयान्वयी अव्यय ,  उद्‌गारवाचक व संबंधशब्द हे शब्दांचे प्रकार आहेत .  यांपैकी पहिले चार विकारक्षम असून उरलेले चार विकारशून्य आहेत .

  

  नाम :  नामात हिंदीप्रमाणे दोनच लिगे  ( पुल्लिगं व स्त्रीलिगं )  आणि दोन वचने  ( एकवचन व अनेकवचन )  आहेत .  शब्दाचे लिं ग त्याच्या रूपावरून कळत नाही .  ते परंपरागत आहे .  नामाचे अनेकवचन लेखनात s  किंवा x हा प्रत्यय लागून होते .  पण हे प्रत्यय अनुच्चारि त असल्यामुळे उच्चारदृष्ट्या बहुसंख्य नामांच्या एकवचनात व अनेकवचनात कोणताच फरक नसतो .  chat  शा ‘ मांजर ’ – chats शा ‘ मांजरे ’ dieu द्य ‘ देव ’ – dieux द्य ‘ देव ’ femme फाम् ‘ स्त्री ’ – femmes ‘ स्त्रिया ’.  काही थोड्या नामांची अनेकवचने मात्र उच्चा रदृष्ट्या भिन्न आहेत  :  cheval  शवाल् ‘ घोडा ’ – chevaux शवो ‘ घोडे ’ boeuf बफ् ‘ बैल ’ – boeufs ब ‘ बैल ’  इत्यादी .

  

 नामाप र्वी एकवचनात पु .  un ,  स्त्री .  une  व अनेकवचनी पु .  स्त्री .  des  हे निर्गुण विशेषण आणि पु .  le ,  स्त्री .  la  व अनेकवचनी पु .  स्त्री .  les  हे निश्चित विशेषण लागते .  स्वरादी नामांपूर्वी le  किंवा la  यांचे  l’ हे संक्षिप्त रूप होते .  व de  हे संबंधशब्द पूर्वी आल्यास le  व les  हे त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांची अनुक्रमे au , aux, du, des ही रूपे होतात .  la  हे विशेषण मात्र अबाधित राहते .

  

 सर्वनाम  :  सर्वनामे पुढीलप्रमाणे आहेत .  

 कर्ता  

 प्रत्यक्ष कर्म  

 अप्रत्यक्ष कर्म  

 संयुक्त शब्दानंतर  

 असंयुक्त  

 एकवचन  

 प्र. पु.  je  ‘मीʼ  

 द्वि. पु.  tu  ‘तूʼ  

 तृ. पु.  il  ‘तोʼ

 elle  ‘तीʼ  

 me

 tu

 le

 la

 me

 te

 lui

 –

 moi

 toi

 lui

 elle

 moi

 toi

 lui

 elle

  

 अनेकवचन  

 प्र. पु.  

 द्वि. पु.   

 तृ. पु.   

 nous

 vous

 ils

 ells

 nous

 vous

 les  

 –

 nous

 vous

 leur

 –

 nous

 vous

 eux

 elles

 nous

 vous

 eux

 elles

  

 या सर्वनामांची स्वामित्वदर्शक विशेषणे अशी  :  

 एकवचन  

 प्र. पु. पु. एक.  mon

 द्वि. पु. पु. एक.  ton

 तृ. पु. पु. एक.  son

 स्त्री. एक.  ma

 स्त्री. एक.  ta

 स्त्री. एक.  sa  

 पु. स्त्री. अनेक  mes

 पु. स्त्री. अनेक  tes

 पु. स्त्री. अनेक  ses

  

 अनेकवचन

 प्र. पु. पु. स्त्री. एक.  notre

 द्वि. पु. पु. स्त्री. एक.  votre

 तृ. पु. पु. स्त्री. एक.  leur

 पु. स्त्री. अनेक  nos

 पु. स्त्री. अनेक  vos

 पु. स्त्री. अनेक  leurs  

  

 हे विशेषण नंतर येणाऱ्या नामाचे लिंग व वचन दाखवते  :  mon fils  ‘ माझा मुलगा ’ – mes fils ‘ माझे मुलगे ’ – ma fille ‘ माझी मुलगी ’ – mes filles ‘ माझ्या मुली ’,  इत्यादी .

  

  विशेषण  :  मुळात व्यंजनान्त असणारी ,  पण ज्यांचे अंत्य व्यंजन आता उच्चारले जात नाही अशी विशेषणे स्त्री – लिंगा त व्यंजनान्त बनतात  :  grand  ग्रां– grande  ग्रांद .  स्वरान्त विशेषणे उच्चारदृष्ट्या अविकारी राहतात . फक्त मुळात अंत्यस्थानी e  नसल्यास लेखनात ती येते  :  habile  आबील् ‘ हुषार ’ ttu तेत्यू ‘ हट्टी ’ – ttue  तेत्यू इत्यादी .  ज्यांचे अंत्य व्यंजन उच्चारले जाते ती विशेषणेही अविकारी राहून लेखनात e  घेतात  :  fier फ्ये र् ‌ ‘ अभिमानी ’ – fie’re  फ्ये र .

  

 काही विशेषणे अंशतः अनियमि त आहेत  :  frais  फ्रे ‘ ताजा ,  थंड ’ Fra ἴche फ्रेश् .

  

 साधारणपणे विशेषणे नामानंतर येतात  :  la langue francsaise-  फ्रेंच भाषा ’, accent aigu ‘ संवृत आघात ’.  काही विशेषणे नामाआधी लाक्षणिक अर्थाने आणि नंतर वाच्यार्थाने येतात – un grand homme  ‘ श्रेष्ठ पुरुष ’ – un homme grand ‘ धिप्पाड माणूस ’.

  

 ‘ एक ’  हे विशेषण सोडून बाकी सर्व संख्याविशेषणे अविकारी आहेत  :

  

 un doigt  ‘ एक बोट ’ – une main ‘ एक हात ’ –

 deux  doigts  ‘ दोन बोटे ’ – deux mains ‘ दोन हात ’.

  


  क्रियापद  :  शब्दांच्या प्रकारांत क्रियापद हा फ्रेंचमधला सर्वांत विकारक्षम प्रकार आहे .

  

    फ्रेंच क्रियापदांची म t ळ रूपे er , ir, oir किंवा re  शेवटी असणारी अहेत .  हे प्रत्यय दुर केले की धातुरूप मिळते .  या प्रत्ययांना अनुसरून पूर्वी क्रियापदांचे चार वर्ग मानले जात .  आधुनिक व्याकरणात मात्र तीन वर्गच मानले जातात  : (१ ) – er शेवटी असणारी  ( फक्त aller  हे क्रियापद सोडून ) , ( २ )  ज्यांच्या शेवटी– ir  आहे व ज्यां चे  वर्तमानकालवाचक धातूसाधित धातूला issant  लागून होते अशी व ( ३ )  बाकीची सर्व .

  

 क्रियापदांची रूपावली अतिशय समृद्ध असून तिच्यात विध्यर्थ ,  संकेतार्थ व इच्छार्थ हे अर्थ आणि वर्तमान ,  अपूर्णभूत ,  पूर्णभूत ,  मिश्रभूत ,  भूतपूर्व ,  भविष्य ,  भविष्य भू त असे काळ आहेत .  यांशिवाय भूतकाल व वर्तमानकालवाचक धातुसाधिते   आहेत .

  

    क्रियापदांत दोन महत्त्वाचे वर्ग आहेत  :  केवल क्रियापदे व आत्मवेधी क्रियापदे .  आत्मवेधी क्रियापदांत कर्ता व कर्म एकच असतात  :  केवल  – j’aime , je t’aime ‘ मी प्रेम करतो ’, ‘ मी तुझ्यावर प्रेम करतो ’.  आत्मवेधी – je m’aime  ‘ मी स्वत : वर प्रेम करतो ’.  मिश्र भूतकाळात काही अपवाद सोडल्यास सरळ क्रियापदाचे सहायक क्रियापद avoir  हे आहे ,  तर आत्मवेधी क्रियापदांचे सर्वत्र tre  हे आहे  :  je t’ai aimee  ‘ मी तुझ्यावर प्रेम केलं ’ je suis sorti’ ‘ मी बाहेर पडलो ’ – je me suis aime’ ‘ मी स्वत ः वर प्रेम केलं ’.  अनेकवचनात आत्मवेधीचा ‘ एकमेकांवर ’  या अर्थानेही प्रयोग होतो .

 खाली   tre  ‘ अस ’  व avoir  ‘ जवळ अस ’  –  या सहायक क्रियापदांची आणि aimer  ‘ प्रेम कर ’ –  व se tuer  ‘ स्वतः चा जीव घे –,    एकमेकांना मार   – ’  यांची वर्तमान ,  भूत व भविष्यकाळांची रूपे नमुन्यादाखल दिली आहेत .  

 वर्तमानकाळ  

  क्रियाविशेषण  :  काही क्रियाविशेषण सिद्ध आहेत  :  vite  ‘ झटपट ’, tard ‘ उशिरा ’,  तर काही क्रियाविशेषणे विशेषणांच्या स्त्रीलिंगी रूपाला  –  ment  हा प्रत्यय लावून होतात  :  bon  ‘ चांगला ’ –  bonnement ‘ चांगल्या प्रकारे ’ sourd ‘ बहिरा ’, sourdement – ‘ बहिरटपणे ’.

  

  उभयान्वयी अव्यये  :  त्यांतील मुख्य अव्यये पुढीलप्रमाणे  :  et  ‘ आणि ’, main ‘ पण ’, ou ‘ किंवा ’, cependant ‘ तरीही ’.  कांही उ भया न्वयी अव्यये अनेक शब्दांची आहेत  :  parce que  ‘ कारण ’, afinque ‘ म्हणून ’,  या हेतूने .

  

  उद्‌गारवाचक  :  काही उद्‌गारवाचके   पुढीलप्रमाणे  :  ah, bon  ‘ अरे वा ,  छान ’,    ‘ अरेरे ’,    ‘ आई ग ’, suffit ‘ बस्स ’, chut ‘ श्‌श् ’, ouf ‘ हुश्श ’.

  

  संबंधशब्द  :  मराठीतील शब्दयोगी अव्ययांचे काम करणारे ,  पण ,  नाम ,  सर्वनाम यापूर्वी येणारे  :  de’  – चा ’,  इ .’  par’  – कडून ,  – ने’   avec’ – बरोबर  ’ sans ‘-  शिवाय ’.

  


  वाक्यरचना  :  नाम क्रियापदापूर्वी येते  :  Guy parle  ‘ गी  बोलतो ’.  कर्म सर्वनाम असल्यास क्रियापदापूर्वी येते  : G uy lui parle ‘गी त्याच्याशी बोलतो ʼ . नाम असल्यास नंतर येते  : Guy parle  Marie  ‘ गी मारीशी बोलतो ’.  प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्मापूर्वी येते  :  Guy donne le livre  Marie  ‘ गी पुस्तक मारीला देतो ’.  बहुतेक विशेषणे नामानंतर येतात : Le monlin rouge  ‘ लाल गिरणी ’, un Coeur simple ‘ निष्कपट मन ’.  क्रियाविशेषण क्रियापदानंतर येते  :  il parle doucement  ‘ तो हळू बोलतो ’ il marche vite ‘ तो भर भर चालतो ’.  नकारार्थी क्रियापदापूर्वी ne  व नंतर pas  चा प्रयोग होतो  :  il ne marche pas vite  ‘ तो भर भर चालत नाही ’. Marie n’aime pas Charles ‘ मारीला शार्ल आवडत नाही ’.  पण rien personne, Jamais ,  इ .  शब्दांबरोबर आणि काही थोड्या क्रियापदांबरोबर फक्त ne  चाच वापर होतो  :  il ment  ‘ तो खोटं बोलतो ’ il ne ment jamais ‘ तो कधीही खोट बोलत नाही ’. Je sais ‘ मला माहीत आहे ’ je ne sais ‘ मला माहीत नाही ’ je ne sais rien ‘ मला काहीही माहीत नाही ’.

  

 प्रश्नवाचक रचना क्रियापद कर्त्यापूर्वी ठेवून होते  :  il ment  ‘ तो खोट बोलतो ’ ment-il? ‘ तो खोटं बोलतो का ’?  याशिवाय स्थल ,  काल व रीतिदर्शक  प्रश्नवाचक अव्यये ही आहेत  :  Ou’ est-il  ? ‘ तो कुठे आहे ?’ Quand partirez vous ? ‘ तुम्ही केव्हा निघणार ?’  त्याचप्रमाणे इतर  प्रश्न वाचक शब्दही आहेत  :  Qui est cet homme ? ‘ हा माणुस कोण आहे ?’   Quel est votre pays ? ‘ तुमचा देश कोणता ?’  ज्या प्रश्नाचे उत्तर ‘ हो ’  किंवा ‘ नाही ’  हे असते तो विधानापूर्वी Est-ce que  हे शब्द ठेवून बनविता येतो  :  I 1  est malade .  ‘ तो आजारी आहे ’. Est-ce qu’il est malade ‘ तो आजारी आहे का ?’

  

संदर्भ : 1. Brunot, F. F. Brunean, C. Grammaire Historique de la Langue . Paris, 1937 .

          2. Gaiffe, S. F. and others, Grammaire Larousse du xxe, Paris,  1936 .

  

 कालेलकर ,  ना .  गो .