फ्रॅंको ,  फ्रॅंन्सिस्को   :  ( ४ डिसेंबर १८९२  –  २० नोव्हेंबर १९७५ ).  स्पेनचा हुकूमशाह आणि सरसेनापती  ( १९३९ – ७५ ).  पू र्ण  नाव पाउ ‌‌ लीनो एर्मेनहेल्दो तेओदेलो .  स्पेनच्या गॅलि शि या प्रांतात एल् फरॉल या गावी जन्म .  त्याच्या आईचे नाव पिलर बॅहामॉन्दे व वडिलांचे नाव निकोलस फ्रॅंको .  निकोलस फ्रॅंको हे नाविक दलात अधि ‌ कारी होते .  ली आल्काथार  ( टोलीडो )  येथील पायदळ अकादमीत सैनिकी प्रशिक्षणानंतर १९१० मध्ये फ्रॅंकोची सैन्यात नियु क्ती .  १९२३ ते १९२७ या काल खं डात स्पेनच्या मोरोक्को वसाहतीत परदेशी सेनादलाचा प्रथम दुय्य म व पुढे त्या दलाचा सेनापती .  मोरोक्कोत असताना त्याने रिफ जमातीचा अब्द अल्- करीम याच्या नेतृत्वाखाली १९२५ साली झालेला उठाव दडपण्याच्या कारवाईत भाग घेतला .  १९२७ ते १९३१ या काळात सॅरगॉसा सैनि ‌ की अकादमीचा तो संचालक होता . तत्कालीन प्रजासत्ताक शासनाने ही अकादमी राजेशाही धार्जिणी असल्याने बंद केली  ( १९३१ ).  १९३५ साली फ्रॅंकोला सेनादलाचा  ( जनरल स्टाफचा )  प्रमुख म्हणू न नेमण्यात आले .  १९३६ साली स्पेनमध्ये समाजवादी प्रजासत्ताक सरकार सत्तेवर आले .  त्या सरकारच्या अमदानीत स्पेनची आर्थीक तशीच राजकीय व सामाजिक परिस्थि ती चिंताजनक झाली .  ही परिस्थि ती काबूत आणण्यासाठी सरकारने आणी बाणी जाहीर करावी ,  असा सल्ला फ्रॅंकोने दिला   तथापि त्याचा सल्ला झिडकारण्यात आला .  युद्ध पुकारून स्पेनमध्ये सैनिकी उठाव झाला .  या उठावाला फ्रॅंकोने प्रजासत्ताकाविरुद्ध स ‌ क्रि य पाठिं बा दिला .  त्यामुळे स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरु झाले .  फ्रॅंकोने राष्ट्रीय सरकार स्थापन केले आणि त्याला इटली व जर्मनी या देशांनी मान्यता दिली .  १९३७ साली त्याने स्वतःला स्पेनचा राष्ट्रनेता  ( एल् काउदिल्यो )  म्हणून जाहीर केले .  १९३९ साली त्याच्या शासनाला ग्रेट ब्रि टन व फ्रान्स यांनीही मान्यता दिली .  स्पॅनिश यादवी युद्ध १९३९ साली संपले .  त्या सालच्या सप्टेंबरमध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले .  प्रारंभी फ्रॅंकोची सहानुभूती जर्मनी व इटलीकडे होती .  जिब्राल्टर व फ्रान्सची मोरोक्को वसाहत बळकावण्याची त्याने एक योजना आखली होती .  पुढे मात्र ‌  महायुद्धाच्या संदर्भात स्पेनने तटस्थता जाहीर केली .  सोव्हिएट रशिया विरुद्ध  ‌ ब्रि टन व जर्मनीने एकजूट करावी ,  असे मत त्याने प्रतिपादन केले होते .  १९४७ साली तह हया त प्रमुख म्हणून फ्रॅंकोला मान्यताही देण्यात आली .  तसेच आपला वारस नेमण्याचा अधि का रही त्यास देण्यात आला .  फ्रॅंकोने स्पेनच्या अंमलाखालील मोरोक्कोला स्वातंत्र्य दिले .  तसेच कायद्याचे सुसूत्रीकरण करू न लोकांना धार्मि क स्वातंत्र्य दिले .  संयुक्त राष्ट्रे या जगातिक सं घट नेतील सदस्यत्वही त्याने स्पेनला मिळवून दिले   तथापि त्याने आपल्या हुकूमशाहीला विरोध करणाऱ्या आचारविचारांवर बंदी घातली होती .  स्पेनमध्ये आणि स्पेनच्या ताब्यातील अटलांटि ‌ क बेटावर तळ स्थापन करण्यात त्याने अमेरिकेला सवलत दिली व तिच्या मोबदल्यात अमेरिकेकडून आ ‌र्थि क मदत मिळवून काही अंशी देशाची आ र्थि क स्थिती सुधारली .  खासगी जीवनात तो अतिशय कर्मठ होता .  फ्रॅंकोने कार्मेन पोलो नावाच्या युवतीशी विवाह केला  ( १९२३ ).  तिच्यापासून त्याला एक मुलगी झाली .  त्याचे खासगी जीवन निष्कलंक होते .  डायरी ऑफ ए ब टालियन  ( १९२२ )  हा त्याचा आठवणी वजा ग्रंथ प्रसिद्ध आहे .  मा ‌ द्रि द ‌  येथे त्याचे हृ दय विकाराने निधन झाले . 

फ्रॅन्सिस्को फ्रँको

 

 पहा : स्पॅनिश यादवी युद्ध   स्पेन  ( इतिहास )

 संदर्भ : 1 . Crozier, Brian, Franco : a Biographical History, London,  1967 .

           2 . Thomas, Hugh, The Spanish Civil War, Harmondsworth,  1971 .

           3 . Trythall J. W. D. Franco: a Blography, London,  1970 .

   खोडवे ,  अच्युत