फैज अहमद ‘ फैज’ : ( १३ फेब्रुवारी १९११– ).  आधुनिक उर्दू कवी.  जन्म सियालकोट येथे.  मूळचे नाव फैज अहमद खान.  सियालकोट येथे शालेय शिक्षण.  नंतर तेथीलच सरकारी महाविद्यालयातून अरबी भाषा घेऊन ते बी. ए. ( १९३१) आणि इंग्रजी घेऊन ए म्. ए. ( १९३४)  झाले.  १९३५ साली तेथील एम्‌.  ए.  ओ.  कॉलेजम ध्ये इंग्रजीचे अधिव्याख्याता म्हणून नेमणूक.  १९४२ मध्ये ते सैन्यात भरती झाले.  १९४७ साली सैन्यातून लेफ्टनंट कर्नल म्हणून निवृत्त.  फाळणीनंतर १९४७ ते ५८ या कालावधीत पाकिस्तान टाइम्स व इमरोझ या नियतकालिकांचे त्यांनी संपादन केले.  या कालावधीतच ‘ रावळपिंडी कटाच्या खटल्या’ त त्यांना अटक झाली आणि चार वर्षे ( १९५१– ५५) त्यांनी तुरुंगवास भोगला.  १९५८ मध्ये त्यांना पुन्हा अटक होऊन १९५९ मध्ये त्यांची सुटका झाली.  लाहोरमधील ‘ पाकिस्तान आर्ट कौन्सिल’ चे ते १९५९ ते ६२ पर्यंत सचिव होते.  पुढे ते लंडनला गेले. तेथून परत आल्यावर १९६४ साली कराची येथील अब्दुल्ला हरून कॉ लेजचे ते प्राचार्य झाले.  रशिया,  अमेरिका,  ईजिप्त आणि इतर देशांचाही त्यांनी वेळोवेळी प्रवास केला.  १९६२ मध्ये इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना लेनिन शांतता पुरस्कार देण्यात आला.

   वाङ्‌ मयाची आवड त्यांच्यात पितृपरंपरेने निर्माण झाली आणि ए म्. डी.  तासीर,  सूफी गुलाम मुस्तफा तबस्सूम,  चिरागहसन हसरत,  पित्रास यांसारख्या प्रसिद्धफैज अहमद ‘फैज’ साहित्यिकांच्या सहवासामुळे त्यांना काव्यलेखनाची दृष्टी मिळाली.  कार्ल मार्क्स,  बेग साँ,  नीत्शे,  शोपेनहौअर,  फ्रॉइड,  कालिदास,  कबीर,  फ्रेझर,  हॅवलॉक एलिस,  गटे,  टॉलस्टॉय,  शॉप्र भृ तींचा त्यांच्यावर कमीअधिक प्रभाव पडलेला आहे.

 जुन्या सांकेतिक प्रेमकाव्याच्या सर्व परंपरा मोडणारा नक्शे फरिवादी ( तक्रार करणारे चित्र- १९४१)  हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. ‘ मुझसे पहिली सी मुहब्बत मिरी महबूब न मांग’  या एका अत्यंत लोकप्रिय कवितेत फैस यांच्या काव्याचे निराळेपण दिसून येते.  विशेषतः देशाला स्वातंत्र्य मिळूनही ज्यांच्या जीवनात काहीही स्थित्यंतर घडून आले नाही,  अशा पददलितांबद्दल त्यांच्या अंतः करणात अपार करुणा आहे.  स्वातंत्र्याच्या प्रभातकाळालाही कुठेतरी रात्रीचा डंख आहे ( सुभे आझादी– स्वातंत्र्याची प्रभात),  याची या कवीला खंत वाटते.  द स्ते-स बा ( पहाटवाऱ्याचा हात–१९५२),  जिदान नामा ( कारागृहाची कथा–१९५६)  या कारावासातील कवितांच्या संग्रहांतून कवीच्या मनातील ही खंत प्रखरपणाने व्यक्त झाली आहे.  भारतीय जीवनाच्या पार्श्वभूमीवरही फैज यांनी काही कविता लिहिल्या आहेत.  कपाळाला शेंदराचा टिळा लावलेल्या भस्मचर्चित पुरोहिताप्रमाणे आभाळ दिसत होते,  अशा खास भारतीय वातावरणामधील प्रतिमाही त्यांच्या कवि तां तून येतात.  दस्ते तहे संग ( दगडाखाली सापडलेला हात–१९६५),  सरे वा दिये सीना( सीनाच्या खोऱ्यात– १९७१)  शामे शहरे यारां (मित्रनगरीतील संध्याकाळ – सु. १९७७) हे त्यांचे आणखी उल्लेखनीय तीन काव्यसंग्रह होत.

   एकूण जीवनाच्या रुक्ष  भ कासपणातूनही या कवीला आशेचे किरण दिसतात. ‘ कुठून तरी एक शंखनाद वातावरणात घुमेल,  कोणीतरी एक सौंदर्यवती प्रकट होईल’,  अशी त्याची श्रद्धा आहे. ‘ अय रोशनि यों के शहर’ ( हे प्रकाशनगरी)  या त्याच्या विख्यात कवितेची अखेरही अशाच आशावादी सुरात झाली आहे.  अभिव्यक्‍तीमधील गेयता आणि आशयातील सहेतुकता यांच्या मिलाफामुळे फैज यांच्या काव्याची लोकप्रियता नवीन,  प्रतिमायुक्त प्रायोगिक काव्याच्या काळातही विस्मयकारक रीत्या टिकून आहे.

   काव्याखेरीज फैज यांनी समीक्षणात्मक लेख,  नाटके,  पत्रात्मक साहित्य असे इतर साहित्यप्रकारही हाताळले आहेत.  मिझान ( तराजू–१९६२),  मता ए लौहो कलम ( पाटी- लेख णी ची दौलत–१९७३)  या त्यांच्या ग्रंथांशिवाय सली बे मेरे दरी चों में ( माझ्या खिडकीतील क्रूस–१९७१)  हे मूळ इंग्रजी पण त्यांनी स्वतःच उर्दूत भाषांतरित केलेले पत्रसाहित्य होय.  ही सारीच पत्रे अत्यंत रंजक व उद्‍ बोधक आहेत.  फि क्रे फैज ( फैजचे विचार)  हा वृत्तपत्रीय अग्रलेखांचा संग्रह आणि उम्रे गुझस्ताकी किताब ( गतजीवनाची कथा)  हे आत्मचरित्र हे त्यांचे संकल्पित आगामी ग्रंथ होत.  त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद व्ही.  जी.  किरनन्‌  यांनी १९५७ मध्ये केला.  १९७९ मध्ये,  दिल्लीच्या शैला भाटिया यांनी आर्ट थिएटरद्वारा,  फैजच्या कवितांवर आधारित ‘ दर्द आयेगा दबे पाँ व’ ( दुः ख येईल हळुवार पावलांनी)  या नावाची एक संगीतिकाही सादर केली.

 नईमुद्दीन,  सैय्यद