फेल्स्पॅथॉइड गट  : खनिजांचा एक गट . फेल्स्पारांशी रासायनिक दृष्ट्या साम्य असणारी ,  मुख्यत्वेकरून सोडियम ,  पोटॅशियम व कॅल्शियम यांची ही ॲल्युमिनो सिलिकेटे आहेत .  फेल्स्पारांच्या तुलनेने त्यांच्यात सिलिकेचे प्रमाण कमी असते .  यामुळे सिलिकेची कमतरता असलेल्या शिलारसापासून ती तयार झाली असावीत ,  असे समजतात .  फेल्स्पारयुक्त खडकात ती असणे शक्य असते मात्र आद्य क्‍वॉर्ट् ‌ झा बरोबर ती कधीच आढळत नाहीत कारण क्‍वॉर्ट् ‌ झ तयार होण्याइतकी सिलिका उपलब्ध असल्यास फेल्स्पॅथॉइडांच्याऐवजी फेल्स्पार तयार होतात  [ फेल्स्पॅथॉइड  +  सिलिका ⟶ फेल्स्पार ].

 फेल्स्पॅथॉइडात सिलिका  :  क्षारीय धातू  ( उदा .,  सोडियम ,  पोटॅशियम इ .)  हे गुणोत्तर कमी असते .  त्यांच्यापैकी काहींत क्लोराइड ,  सल्‍फा इड ,  सल्फेट किंवा कार्बोनेट ही मूलके  ( निरनिराळ्या विक्रियांत स्थिर राहणारे परंतु स्वतंत्र अस्तित्व नसलेले अणुगट )  असतात .  नेफेलीन ,  सोडालाइट ,  ल्यूसाइट ,  कॅंक्रिनाइट ,  हॉयेनाइट  ( हॉयेन ),  नोसेलाइट  ( नोसीयन ),  लॅझुराइट ही खनिजे या गटात येतात .  सोडालाइटात क्लोरीन ,  कँ क्रिनाइटात कार्बोनेट ,  नोसेलाइटात सल्फेट ,  लॅझुराइटात सल्फेट ,  सल्फाइड आणि क्लोरीन ही मूलके असतात .  कधीकधी ॲनॅलसाइम हे खनिज सिलिकेची कमतरता असणाऱ्या अ ग्‍नि ज खडकांमध्ये प्राथमिक स्वरूपात आढळते म्हणून त्याचाही समावेश फेल्स्पॅथॉइडांमध्ये करतात .

 फेल्स्पॅथॉइडांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे फेल्स्पार आणि झिओलाइट या गटांच्या गुणध र्मां च्या दरम्यानचे असतात  [ ⟶ फेल्स्पार गट  झिओलाइट गट ].  कोष्टकात काही फेल्स्पॅथॉइडांची काही वैशिष्ट्ये दिली आहेत .  या खनिजांचे वि . गु .  २ ·१५ ते २ ·९० व कठिनता ५ ते ६ ·५ दरम्यान असून नेफेलीन वगळता सर्वांची चमक काचेसारखी असते आणि कँ क्रिनाइट वगळता सर्वांचे ⇨ पाटन अस्पष्ट असते किंवा नसतेही .  हॉयेनाइट व नोसेलाइट ही सूक्ष्मदर्शकाने पाहिल्यासही अगदी सारखी दिसतात .  मात्र त्यांचे रासायनिक संघटन वेगळे आहे . संरचनात्मक दृष्ट्या फेल्स्पॅथॉइडे ही टेक्टो – सिलिकेटे आहेत .

                                    फेल्स्पॅथॉइडांचे  रासायनिक संघटन  व काही गुणधर्म 

 खनिज 

 रासायनिक संघटन 

 स्फटिक समूह

 रंग 

 ल्यूसाइट 

&ltp KAlSi2O6

 छद्मघनीय

 पांढरा, करडा वा गुलाबी

 नेफेलीन 

&ltp (Na, K) (AlSiO4)

 षट्‍‌कोणी 

 रंगहीन, पांढरा वा पिवळा 

 कँ क्रिनाइट 

 3NaAlSiO4 ·  CsCO3 · H2O

 षट्‍‌कोणी 

 पांढरा, करडा वा निळा 

 सोडालाइट 

 3NaAlSiO 4   · NaCl

  &ltp निळा ते निळसर हिरवा
 

 m3NaAlSiO4  · CaSO4

  &ltp निळसर हिरवा
 

 n3NaAlSiO4  · Na2S

  &ltp करडा वा उदी
  &ltp Na2S (AlSiO4)

 घनीय 

 निळा 

 कॅलिओफायलाइट 

&ltp KAlSi2O5

 षट्‍‌कोणी

 रंगहीन वा पांढरा

 ॲ नॅलसाइम

 NaAlSi2O6 · H2O

 घनीय

 रंगहीन, करडा वा पिवळा

 पोल्युसाइट

 Cs4Al4Si9O28 ·  H2O

 घनीय

 रंगहीन

 मारिआलाइट

&ltp Na4Al3Si9O24Cl

 चतुष्‍कोणी

 बहुधा पांढरा, करडा

 मीओनाइट

&ltp Ca4Al6Si6O24CO3

 चतुष्‍कोणी

 बहुधा पांढरा, करडा

   त्यांच्यातील SiO4 व AlO4 यांचे चतुष्फलक फेल्स्पारातल्याप्रमाणे एकमेकांस जोडलेले असतात व धातवीय अणू किंवा मूलक या चतुष्फलकांच्या सांगाड्यामधील रिकाम्या जागांत असतात.  Al : Si हे गुणोत्तर सर्व फेल्स्पॅथॉइडांत उच्च असते.  त्यामुळे अम्‍ला मध्ये अपघटन होण्याचा  ( रेणूचे तुकडे होण्याचा )  गुणधर्म त्यांच्यात येतो.  अम्‍लामध्ये त्यांच्यातील ॲल्युमिन्याचे विद्रावण  ( विरघळण्याची क्रिया )  होऊन ते द्रावातून निघून जाते व जिलेटिनी सिलिका शिल्लक राहते.

 फे ल्स्पॅथॉइडे नेफेलीन सायेनाइट ,  इयोलाइट या अंतः क्षेपित  ( घुसलेल्या रूपातील )  खडकांत तसेच फोनोलाइट ,  टेफ्रॉइट ,  बेसानाइट ,  नेफेलीन बेसाल्ट या लाव्ह्याच्या खडकांत आढळतात .  रशियातील कोला महाद्वीपकल्पामध्ये नेफेलीन सायेनाइट हे प्रचंड प्रमाणात आहेत ,  तसेच ते अमेरिकेतील आर् ‌ कॅन्सॉ राज्यात व कॅनडा ,  ग्रीनलंड ,  भारत व नॉर्वे या देशांत आहेत .  कॅंक्रिनाइट ,  सोडालाइट ,  हॉयेनाइट व नोसेलाइट ही नेफेलिनाबरोबर बऱ्याच वेळा आढळतात  उदा .,  बँ क्रॉफ्ट ,  आँ टेरिओ  ( कॅनडा ),  मायास  ( दक्षिण उरल पर्वत ).  पोटॅशियम भरपूर व सिलिका कमी असलेल्या लाव्ह्यांच्या खडकांत ल्यूसाइट आढळते .  त्याचे मोठे निक्षेप इटलीत आहेत .  लॅझुराइट रूपांतरण झालेल्या  ( तापमान व दाब यांच्यामुळे बदल होऊन तयार झालेल्या )  काही चुनखडकांत आढळते .  भारतामध्ये शिवानमलई ,  कोईमतूर ,  विशाखापटनम् ‌,  किशनगढ  ( राजस्थान )  व जुनागढ  ( गुजरात )  येथे नेफेलीनयुक्त सायेनाइट खडक आढळतात ,  तर दक्षिण ट्रॅप व राजमहाल ट्रॅप खडकांत कोठे कोठे ॲनॅलसाइम आढळले आहे .

 फेल्स्पॅथॉइडांचा विशेषतः नेफेलिनाचा उपयोग काच ,  तुरटी व मृत्तिका उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून केला जातो .  लॅझुराइट हे लॅपिस लॅझुली या रत्नातील प्रमुख खनिज असून त्याचा रंगद्रव्य म्हणूनही उपयोग केला जातो .  सोडालाइटाचाही कधीकधी मौल्यवान खडा म्हणून वापर होतो .

 पहा  :  ॲनॅलसाइम  झिओलाइट गट  नेफेलीन  फे ल्स्पार गट  लॅ झु राइट  ल्यूसाइट  सोडालाइट .

 आगस्ते ,  र .  पां .  ठाकूर ,  अ .  ना .