प्रतिगुरुत्व : ‘गुरुत्वाकर्षणीय’ प्रेरणेमुळे दोन पदार्थांकडून परस्परांचे अपकर्षण केले गेल्यास त्या आविष्काराला प्रतिगुरुत्व ही संज्ञा देता येईल.

व्यवहारात आढळणाऱ्या पदार्थांचे द्रव्यमान धन (चिन्हयुक्त) असते व अशा दोन पदार्थांमध्ये गुरुत्वाकर्षणामुळे आकर्षण प्रेरणा उत्पन्न होते परंतु एखाद्या पदार्थाचे द्रव्यमान ऋण असेल, तर तो पदार्थ व इतर धन द्रव्यमानाचे पदार्थ यांच्यामध्ये अपकर्षण होईल.

आयझॅक न्यूटन यांच्या, त्याचप्रमाणे ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार ऋण द्रव्यमानयुक्त पदार्थाची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजेच सैद्धांतिक दृष्ट्या प्रतिगुरुत्व शक्य कोटीतील आहे परंतु १९७९ पर्यंत प्रत्यक्ष प्रयोगांत ही गोष्ट सिद्ध झालेली नव्हती. प्रतिगुरुत्व सत्य सृष्टीत उतरल्यास त्याचे अनेक उपयोग होऊ शकतील उदा., अवकाशप्रवास अत्यंत सहजतेने करता येईल.

पहा : गुरुत्वाकर्षण.

धन, प. द.