सॉफ्टबॉल : मैदानी सांघिक खेळाचा एक प्रकार. सॉफ्टबॉलला प्ले ग्राऊंड बॉल असेही म्हणतात. या खेळाची मूलतत्त्वे, स्वरुप, खेळण्याची पद्घती इ. बाबतींत ⇨ बेसबॉल  या खेळाशी ह्याचे खूपच साम्य आहे. सॉफ्टबॉल क्रिडांगणहिवाळ्यातही बेसबॉल खेळता यावा, म्हणून जॉर्ज डब्ल्यू. हॅन्‌कॉक याने शिकागो येथे १८८७ मध्ये अंतर्गेही (इन्‌डोअर ) बेसबॉलचा प्रकार शोधून काढला, त्यातूनच पुढे सॉफ्टबॉल हा खेळ उगम पावला. या खेळाचे प्राथमिक नियमही हॅन कॉकनेच तयार केले. १८९५ मध्ये मिनीॲपोलिसच्या लूईस रॉबरने ह्या खेळाला बहिर्गेही मैदानी खेळाचे स्वरुप प्राप्त करुन दिले. सध्याचा खेळ रॉबरच्या पद्घतीनेच खेळला जातो. १९०० मध्ये मिनीॲपोलिस येथे सॉफ्टबॉलची पहिली स्पर्धा झाली व १९०८ मध्ये ‘नॅशनल अमॅच्युअर प्ले ग्राऊंड बॉल असोसिएशन’ ही संस्था स्थापन होऊन सॉफ्टबॉलला संघटित स्वरुप लाभले. लिओ फिशरने ह्या खेळाच्या प्रगतीस हातभार लावला व त्याच्याच प्रयत्नामुळे सॉफ्टबॉलची पहिली राष्ट्रीय स्पर्धा अमेरिकेत १९३३ मध्ये झाली. त्यानंतर अल्पावधीतच ‘अमॅच्युअर सॉफ्टबॉल असोसिएशन’ ही संघटना स्थापन करण्यात आली (१९३३). ह्या संघटनेने अमेरिकेतील ह्या खेळाचे नियमन करुन त्याला सुविहित व नियमबद्घ स्वरुप दिले. १९३३ मध्ये या नियामक समितीची स्थापना झाली. अमेरिकेत या खेळाला चालना देऊन तो विकसित करण्याचे श्रेयही या संघटनेला दिले जाते. या संघटनेने तयार केलेल्या नियमसंचानुसारच आता हा खेळ सर्वत्र खेळला जातो.

बेसबॉलप्रमाणेच सॉफ्टबॉल हा खेळ प्रत्येकी नऊ खेळाडूंच्या दोन संघांत खेळला जातो. त्यांपैकी फलंदाजी करणारा संघ बेसबॉलप्रमाणेच मैदानाच्या चारी तळांना ( बेस ) धावून मंडल पूर्ण करतो व एकेक धाव करीत जास्तीत जास्त धावा जमविण्याचा प्रयत्न करतो, तर क्षेत्ररक्षण करणारा संघ फलंदाज व तळधावक यांना बाद करीत त्यांना कमी धावांत रोखण्याचा प्रयत्न करतो. जो संघ जास्त धावा करेल, तो विजयी ठरतो. या खेळाचे स्वरुप, क्रीडांगणाची रचना इ. बेसबॉलप्रमाणेच आहे तथापि सॉफ्टबॉल व बेसबॉल यांत काही महत्त्वाचे फरकही आहेत. सॉफ्टबॉलचे क्रीडांगण हे बेसबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने लहान असते. त्याचे ‘आंतरक्षेत्र’ (इनफील्ड) वा ‘डायमंड’ हेही बेसबॉलच्या क्रीडांगणापेक्षा कमी असते. सॉफ्टबॉल खेळातील बॅट दंडगोलाकार असून ती मुठीकडे म्हणजे पकडीच्या बाजूस निमुळती होत गेलेली, तर दुसऱ्या टोकास जाड असते. त्या जाड भागाच्या गोलाकाराचा व्यास इंच २/ इंचापेक्षा (६·४ सेंमी.) जास्त असू नये, तसेच बॅटची ३४ इंचांपेक्षा (८६ सेंमी.) जास्त असू नये, असा नियम आहे. सॉफ्टबॉल खेळातला चेंडू बेसबॉलपेक्षा आकाराने मोठा, पण वजनाने हलका असतो. चेंडूचे वजन ६/४  ते ७ औंस (१७७ ते १९८ ग्रॅम) व परिघ १२ इंच लांबी (३० सेंमी.) असतो. बेसबॉलमध्ये गोलंदाज चेंडू खांद्यावरुन टाकतो, तर सॉफ्टबॉलमध्ये गोलंदाजी करताना चेंडू खांद्याच्या खालून ( अंडर आर्म ) टाकला जातो, हा महत्त्वाचा फरक आहे. या चेंडूच्या आत ‘कॅपोक’ हे मृदू द्रव्य पूर्वी भरलेले असे, आता रबर व बूच यांचे मिश्रण भरतात. त्यावर धाग्याचे व चामड्याचे वेष्टन शिवण्यात येते. बेसबॉल खेळाडूंपेक्षा सॉफ्टबॉल खेळाडू हे कमी प्रमाणात संरक्षक साधने वापरतात. त्यांत जाड कातडी हातमोजे, संरक्षक जाळीदार मुखवटे, कॅन्‌व्हास बूट इ. असतात. गोलंदाजाने योग्य प्रकारे चेंडू टाकला नाही, तर ‘बॉल वन’ असे पंच जाहीर करतो. याप्रकारे गोलंदाजाने चार चेंडू चुकीचे टाकल्यास फलंदाज आपोआपच पहिल्या कट्टीवर जातो.

या खेळातील काही जागांना व खेळाडूंना बेसबॉलप्रमाणेच विशिष्ट तांत्रिक, पारिभाषिक नावे असतात. सॉफ्टबॉलचा, प्रत्यक्ष खेळ जिथे चालतो, त्या आंतरमैदानाला त्याच्या विशिष्ट आकारामुळे ‘डायमंड’ असे म्हणतात. तो साठ फुटांचा (१८·२८ मी.) चौरस असतो. चेंडू टाकतो, तो गोलंदाज ( पिचर ), हातात दंडगोलाकार बॅट घेऊन खेळतो, तो फलंदाज (बॅटर ), त्याला धावा काढताना साथ देतात, ते तळधावक (बेस-रनर ), फलंदाजाच्या मागे चेंडू झेलण्यासाठी उभा असतो, तो झेलकरी ( कॅचर ) व इतर क्षेत्ररक्षक (फिल्डर्स ) हे खेळाडू महत्त्वाचे आहेत. ‘डायमंड’ मधील फलंदाज व गोलंदाज यांच्यातील अंतर पुरुषांच्या खेळात ४६ फूट (१४ मी.), तर स्त्रियांच्या खेळात ४० फूट (१२ मी.) असते. गोलंदाज जिथून चेंडू टाकतो, ती गोलंदाजी-फळी ( पिचर्स प्लेट), तिची लांबी ६१ सेंमी. व रुंदी १५ सेंमी. असते. फलंदाज जिथे उभा राहतो, तो फलंदाज-कक्ष ( बॅटर्स बॉक्स ), झेलकरी ज्या जागेवर उभा राहतो, तो झेलकरी-कक्ष ( कॅचर्स बॉक्स ) असून त्याची लांबी ३·०५ मी. व रुंदी २·५७ मी. असते. प्रशिक्षक ज्या ठरावीक जागी उभा राहतो, तो प्रशिक्षक-कक्ष (कोचेस बॉक्स ) होय. ही त्या त्या कक्षांची नावे होत. डायमंडच्या चार कोनांत गृहफळी ( होम प्लेट ), तसेच पहिला, दुसरा व तिसरा तळ ( बेस ) असतात. प्रत्येक कट्टीवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूस बेसमन म्हणतात. हे ‘बेस’ म्हणजे कॅन्‌व्हासचे १५ इंचाचे (३८ सेंमी.) चौरस असून ते जमिनीत रोवलेले असतात, तर ‘होम प्लेट’ ही १७ इंचाची (४३ सें मी.) रबराची पंचकोनी फळी असते. या खेळाचे नियंत्रण करण्यासाठी सामनाधिकारी ( पंच ) नेमला जातो. कोणत्या संघाने प्रथम फलंदाजी करावयाची, हे नाणेफेकीच्या निकालावर अवलंबून असते. तीन गडी बाद झाले, की संघाचा एक डाव संपतो. सॉफ्टबॉलच्यासामन्यात एकूण सात डाव ( इनिंग्ज ) खेळले जातात.गोलंदाजाने चेंडूटाकल्यावर फलंदाजाने तो दूरवर मारुन धावा काढायच्या असतात.फलंदाज पहिल्या, दुसऱ्या वतिसऱ्या तळाला शिवून गृहफळीवर परतयेतो, तेव्हा मंडल पूर्ण होऊन एक धाव होते. गोलंदाजाकडून चेंडूटाकलाजाईपर्यंत तळधावकांना तळ सोडून धावण्याची मुभा नसते.गोलंदाजाने टाकलेले व मारण्याजोगे तीन चेंडू हिशेबात धरलेजातात.पैकी गोलंदाजाने योग्य तऱ्हेने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला नाही, तरपहिल्या न मारलेल्या चेंडूस ‘स्ट्राइकवन ’, दुसऱ्यास ‘स्ट्राइक टू ’ वतिसऱ्यास ‘स्ट्राइक थ्री ’ म्हणतात. याप्रमाणे तीनही स्ट्राइक झाले की,फलंदाज बादहोतो. तसेच फलंदाजाने दोन वेळा चेंडू प्रमादक्षेत्रातमारला व तिसऱ्यांदा चेंडू मारताना हुकला व तो चेंडू मागे उभ्याअसलेल्या झेलकऱ्याने  झेलला तरी फलंदाज बाद होतो. त्याचप्रमाणे तोझेलबाद व धावबादही होऊ शकतो.सॉफ्टबॉलमधील हारजीत उभयसंघांच्या धावसंख्येवर ठरते. जो संघ प्रतिपक्षापेक्षा जास्त धावा काढेलतो जिंकतो. पाचडाव झाल्यावर सामना अनिर्णित राहिल्यास निकाललागेपर्यंत डाव खेळावे लागतात. त्यामुळे फलंदाजाने अचूकपणेजोरातटोला मारण्याला या खेळात महत्त्व असते. तसेच चेंडू टाकण्याची गती हेगोलंदाजाचे प्रमुख शस्त्र असते. यातूनसामना रंगतो. चेंडू टाकणाऱ्याच्याहाती खेळाचे आक्रमक व बचावात्मक पवित्रे असतात.

या खेळाचे आधुनिक सुटसुटीत स्वरुप, खेळासाठी लागणारी कमीजागा व कमी खर्च यांमुळे अमेरिकेत सॉफ्टबॉलला वाढती लोकप्रियतामिळाली. अमेरिकन फौजांनी सॉफ्टबॉलचा खेळ परदेशातही रुजविण्याचेकार्य केले. ‘दइंटरनॅशनलसॉफ्टबॉल फेडरेशन’ ही आंतरराष्ट्रीय संघटना१९५२ मध्ये फ्लॉरिडा येथे स्थापन करण्यात आली.ती या खेळाचेआंतरराष्ट्रीय सामने आयोजित करते. सुमारे ७० राष्ट्रे या संघटनेचीसदस्य आहेत. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, इटली, मेक्सिको, न्यूझीलंड, तैवान इ. देशांतही सॉफ्टबॉलची लोकप्रियता दिवसेंदिवसवाढत आहे. १९६५ मध्ये मेलबोर्न येथे स्त्रियांची व १९६६ मध्येमेक्सिको येथे पुरुषांची पहिली जागतिक सॉफ्टबॉल स्पर्धा झाली. २००३मध्ये पुरुषांसाठी व २००४ मध्ये स्त्रियांसाठी मानिला (फिलिपीन्स येथे तसेच २०१० मध्ये स्त्रियांसाठी क्वालालुंपुर ( मलेशिया ) येथेसॉफ्टबॉल स्पर्धा झाल्या. यांमध्ये भारतीय खेळाडूंचा सहभाग होता.

भारतात दुसऱ्या महायुद्घानंतरच्या काळात हा खेळ हळुहळूलोकप्रिय होऊ लागला. ‘ऑल इंडिया सॉफ्टबॉल असोसिएशन’ ची स्थापना झाल्यापासून तर भारतात राष्ट्रीय स्पर्धाही भरविण्यात येऊलागल्या. १९६७ व ६८ मध्येझालेल्या स्पर्धांत महाराष्ट्र  संघ अजिंक्यठरला, तर पुढे आंध्र प्रदेशचा संघ सर्वश्रेष्ठ ठरला. महिलांच्या सॉफ्टबॉलस्पर्धांत १९६७ पासून १९७२ पर्यंत महाराष्ट्र संघानेच आपले वर्चस्वगाजविले. २००० मध्ये १९ वर्षांखालील मुलींसाठीऔरंगाबाद येथेसॉफ्टबॉल स्पर्धा भरविण्यात आली.

थोडक्या वेळात, थोडक्या जागेत व थोड्या खर्चात लहान मुलामुलींनातसेच प्रौढ स्त्री-पुरुषांना व्यायाम व आनंद देणाराआणि सर्वांचे मनोरंजनकरणारा हा खेळ आहे.

संदर्भ : Arlott, John, The Oxford Companion to Sports and Games, Oxford, 1074.

पंडित, बाळ ज.