अबुल फज्ल : (१५५१–१६०२). प्रसिद्ध मोगल सम्राट अकबर याचा खाजगी चिटणीस व विश्वासू मित्र. हा एक बुद्धिवादी विद्वान होता. उलेमांनी अबुल फज्लच्या वडिलांचा छळ केला होता. तो इस्लाम धर्मांतर्गत उदारमतवादी बनला. त्याने मोगल दरबारातील प्रतिगामी विचारांच्या उलेमांचे वर्चस्व हाणून पाडले. उलेमांचे धार्मिक वर्चस्व कमी करण्याकरिता काढलेला जाहीरनामा व अकबराने नव्याने स्थापिलेल्या धर्माचा प्रमाणग्रंथ ðदीन-ए-इलाही  या दोन्हींच्या मागची प्रेरणा अबुल फज्लचीच. आपल्या निष्ठावान मित्राचा खून आपल्याच जहांगीर या मुलाकडून व्हावा, यामुळे अकबराला अत्यंत दुःख झाले.

अबुल फज्लने अनेक ग्रंथ लिहिले व अनेक भाषांतरित केले. त्याचा सर्वांत मोठा व प्रसिद्ध ग्रंथ ðअकबरनामा हा होय. ð आईन-ई-अकबरी हा त्याचाच एक भाग आहे.

पहा : अकबर.

  खोडवे, अचुत्य