अर्क : एखाद्या पदार्थातील प्रभावी कार्यकारी घटक काढून घेण्याच्या क्रियेला ‘अर्क काढणे’ असे म्हणतात.

 

अर्क काढण्याच्या अनेक पद्धती आहेत. थंड, गरम किंवा उकळते पाणी किंवा अल्कोहॉल इ. विद्रावकांमध्ये (विरघळविणाऱ्या पदार्थांमध्ये) योग्य वेळ ठेवल्यामुळे मूळ पदार्थातील प्रभावी घटक विद्रावकात विरघळून उतरतो. या पद्धतीचा उपयोग औषधी पदार्थांची टिंक्चरे, काढे, आसवे इ. बनविण्यासाठी केला जातो. सुगंधी द्रव्यांचा अर्क काढून त्यापासून अत्तरे बनविली जातात.

 

ढमढेरे, वा. रा.