अरेबियन वाळवंट : पूर्व ईजिप्तमधील वाळवंट. याच्या पश्चिमेस नाईल नदी, दक्षिणेस न्यूबिआचे वाळवंट, पूर्वेस तांबडा समुद्र व उत्तरेस भूमध्य समुद्र आहे. नाईलपासून इराणच्या आखातापर्यंत पसरलेल्या वाळवंटांनाही कित्येकदा अरेबियन अथवा अरबस्तानचे वाळवंट म्हणून संबोधतात.

 

शाह, र. रू.