अमा : एक प्राचीन सुमेरियन नगर. इराकमधील टायग्रिस-युफ्रेटीस दुआबामधील दिवानीया प्रांतात व ॲन् नासिरिया शहराच्या सु. ८० किमी. वायव्येस याचे अवशेष मिळाले आहेत. इ.स.पू. ३००० वर्षांपूर्वी हे सुमेरियातील भरभराटलेले शहर होते. नगरराज्यांमध्ये होणाऱ्या युद्धात शेजारील लेगॅश नगरराज्याने अमाचा पराभव केल्याच्या शिल्पाकृती आढळल्या आहेत. इ.स.पू. २४०० मध्ये अमाच्या लुगालझॅगेसी राजाने सर्व शहरांवर लष्करी सत्ता स्थापल्याचा पुरावा मिळतो, परंतु हे शहर पुढे अक्कडांनी जिंकून घेतले. 

जोशी, चंद्रहास