ॲग्लोमरेट : (ज्वालामुखी कोणाश्म). ज्वालामुखीतून बाहेर फेकले गेलेले व धारदार कडा असलेले लहानमोठे धोंडे साचून व एकत्र चिकटविले जाऊन तयार झालेला खडक. तो ज्वालामुखी केंद्राच्या जवळपास आढळतो. ज्वालामुखीची क्रिया मंद झाली किंवा थांबली असताना त्याच्या कुंडातील लाव्ह्याचे पृष्ठ निवून घन थर तयार होतो व त्यानंतरच्या उद्गिरणाच्या (उद्रेकाच्या) प्रारंभी तो थर छिन्नविच्छिन्न करून उडवून टाकला जातो. ॲग्लोमरेटांचे धोंडे व लुकण ही बव्हंशी ज्वालामुखी पदार्थांची असतात. पण ज्वालामुखीच्या पायाच्या किंवा नळाच्या भिंतीच्या खडकांपासून तुटून निघालेले धोंडेही त्यांच्यात असणे शक्य असेत.
केळकर, क. वा.
“