अँटिऱ्हा‍यनम : (इं. स्‍नॅपड्रॅगॉन लॅ. अँटिऱ्हा‍यनम मॅजुस, कुल-स्क्रोफ्यूलॅरिएसी). ही बहुवर्षायू (पुष्कळ वर्षे जगणारी) ⇨ओषधी मूळची भूमध्यसामुद्रिक प्रदेशातील असून भारतात सु. १,३९५ मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात तिची बागेत शोभेकरिता वर्षायू (एक वर्ष जगणारी) म्हणून लागवड करितात. पाने समोरासमोर, अंडाकृती, भाल्यासारखी टोकदार व अखंड फुले मोठी (जानेवारी-एप्रिल) शेंड्याकडे कणिशावर किंवा मंजरीवर [→ पुष्पबंध] येतात ती विविध रंगांची (पिवळी, गुलाबी, लाल, पांढरी, निळी इ.) असून खुज्या किंवा उंच प्रकारच्या खोडांवर येतात. पुष्पमुकुट द्व‌योष्ठक (बद्धओष्ठी, मिटलेल्या बोंडाप्रमाणे बहार सामान्यतः हिवाळ्याच्या शेवटापासून उन्हाळाभर असतो बोंडे छिद्रांनी तडकतात बिया अनेक नवीन लागवड बियांपासून करतात. भरपूर खतावलेली जमीन, दोन बियांत सु. ४० सेंमी. अंतर व भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. 

पहा : स्क्रोफ्यूलॅरिएसी.

जमदाडे, ज. वि.

अँटिर्‍हायनम