अपॉसल : ख्रिस्ती धर्मात येशू ख्रिस्ताच्या बारा प्रमुख शिष्यांना ‘अपॉसल’ ही संज्ञा लावली जाते. अपॉसल याचा अर्थ धर्मदूत. अपॉसल म्हणजे प्रेषित नव्हे. नव्या कराराच्या पाचव्या पुस्तकात मूळ बारांखेरीज पॉलप्रभृती इतर शिष्यांनाही अपॉसल्स संबोधण्यात आले. शेवटी पाचव्या शतकात चर्चचे मुख्याधिकारी बिशप यांनाही अपॉसल म्हणण्यापर्यंत या शब्दाचा अर्थ ताणला गेला. मूळ बारा अपॉसल्सपुरताच तो मर्यादित ठेवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.

पहा : येशू ख्रिस्त

आयरन, जे. डब्ल्यू.