अल्माकँटर : अल्माकँटर (किंवा अल्मुकँटर) हे खगोलावरील एक काल्पनिक वर्तुळ आहे. क्षितिजाशी समांतर अशी खगोलावर जी लघुवर्तुळे कल्पितात, त्यांना ‘अल्माकँटर’ म्हणतात. ज्याप्रमाणे पृथ्वीवर विषुववृत्ताशी समांतर वर्तुळे अक्षांश दर्शवितात, त्याप्रमाणे खगोलावरील क्षितिजसमांतर वृत्ते उन्नतांश दर्शवितात.

एस्. सी. चांडलर यांनी १८८७ साली शोधून काढलेल्या उन्नतांश मोजणाऱ्‍या किंवा ठराविक उन्नतांशाची वेळ काढणाऱ्या यंत्रासही अल्माकँटर हे नाव दिले आहे. दोन ताऱ्यांचे उन्नतांश सारखे झाले म्हणजे ते तारे एकाच अल्माकँटरवर आले असे म्हणतात.

फडके, ना. ह.