अश्वगंधा : (कंचुकी हिं. असगंध गु. असोदा क. अमंगुरा सं. अश्वगंधा इं. विंटरचेरी लॅ. विथानिया सोम्निफेरा, कुल–सोलॅनेसी). सुमारे ०·३–१·५ मी. उंचीचे हे लहान झुडूप भारतात रुक्ष ठिकाणी आढळते शिवाय श्रीलंका, सिंध, भूमध्यसामुद्रिक विभाग इ. प्रदेशांतही सापडते. फांद्या अनेक व त्यांवर तारकाकृती केस असतात.
पाने साधी, अंडाकृती (५–१० X २·५–५ सेंमी.), लवदार पाच हिरवट-पिवळसर, लहान फुलांचा झुबका (चामराकृती वल्लरी, → पुष्पवंध) फुलांची संरचना सामान्यत: ⇨सोलॅनेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे : मुदुफळ लाल, सु. ६ मिमी. व्यासाचे फुगीर, संवर्ताने वेढलेले [→ फूल] बी पिवळे मूळ कामोत्तेजक, आरोग्य पुन:स्थापक, पौष्टिक, मूत्रल, गुंगी आणणारे, रेचक क्षय, संधिवात, अशक्तपणा इ. निवारक पाने कडू, ज्वरनाशक गळू, सूज वगैरेंवर मुळांचे पीठ व पानांचा चोथा लावतात.
जोशी, रा. ना.