अनुरूपादेवी: (?१८८२—?१९५८). बंगाली कादंबरीकर्त्या. वडिलांचे नाव राय मुकुंददेव मुखोपाध्याय. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व लेखक भुदेव मुखोपाध्याय हे त्यांचो आजोबा. पतीचे नाव शेखरनाथ बंदोपाध्याय. घरातील अनुकूल वातावरणामुळे प्रथमपासून त्यांना साहित्याची आवड होती. शरच्चंद्र चतर्जी यांच्या काळी लेखक-लेखिकांची जी एक प्रभावळ निर्माण झाली, तीत अनुरूपादेवींचे स्थान बरेच वरचे होते. त्यांनी कथा व कादंबऱ्या लिहिल्या असल्या, तरी मुख्यत्वेकरून कादंबरीकर्त्या म्हणूनच त्या प्रसिद्ध आहेत. पोष्यपुत्रमंत्रशक्ति, मा, महानिशा इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कादंबऱ्या इतक्या लोकप्रिय झाल्या, की त्यांना ‘उपन्यास सम्राज्ञी’ म्हणूनच वाचक ओळखू लागले.  

कमतनूरकर, सरोजिनी