चक्रवर्ती, अमिय : (? १९०१ —  ). बंगाली कवी. शांतिनिकेतन येथे वास्तव्य. समकालीन कवींत दर्जेदार कवी म्हणून ख्याती. रवींद्रनाथांचे सान्निध्य व सहवास लाभल्याने, त्यांच्या कवितेवर रवींद्रनाथांच्या काव्याची छाया पडलेली दिसते. अमियबाबूंच्या कविता म्हणजे जीवनावर चलच्चित्रच. त्यांचे कविमन बंगालच्या मातीत खोलवर रुजलेले आहे.

खसडी (१९३८), एक मुठो (१९३९), माटिर देयाल (१९४२), पारापार (१९५३), पालाबदल (१९५५) इ. अमियबाबूंचे काव्य ग्रंथ विशेष उल्लेखनीय होत. त्यांच्या काव्यात जसे भावनेचे वैशिष्ट्य दिसते तसेच शैलीचे नाविन्यही आढळते. त्यांची शब्दकळा अभिनव असूनही बंगाली भाषेच्या प्रवृत्तीशी जुळणारी आहे.

सेन, सुकुमार (बं.) कमतनूरकर, सरोजिनी (म.)