अक्कलकोटकर स्वामी: (? —१८७८). दत्तसंप्रदायी सत्पुरुष. त्यांच्या पूर्वायुष्याबाबत काहीच माहिती मिळत नाही. १८५७ मध्ये ते अक्कलकोट (सोलापूर जिल्हा) येथे आले व अखेरपर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट येथे त्यांची समाधी आहे. लोक त्यांना ⇨नरसिंहसरस्वतींचा म्हणजेच दत्ताचा अवतार मानीत. त्यांनी अनेक चमत्कार केल्याचे सांगतात. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा विशेष प्रसार झाला.

पहा : दत्तसंप्रदाय.

फरांडे, वि. दा.