अंजनगाव-सुर्जी : अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील शहानूर नदीवरील अंजनगाव व सुर्जी ह्या दोन गावांचे मिळून बनलेले गाव. लोकसंख्या २७,८९७ (१९७१). येथे १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला. याचे क्षेत्रफळ ३.३७ चौ. किमी. आहे. १९७१ मधील गावाची साक्षरता ४५.११ टक्केहोती. येथील दोन माध्यमिक शाळांपैकी एकबहु-उद्देशी आहे. सरकी काढून गठ्ठे बांधणे व हातमाग हे येथील प्रमुख उद्योगधंदे असून कापूस, विड्याची पाने व भाजीपाला यांचा येथे व्यापार चालतो. अचलपूर-मुर्तिजापूर या अरुंद रेल्वेमार्गावरील हे स्थानक दर्यापूर, अचलपूर, आकोट या शहरांशी सडकांनी जोडलेले आहे. पेशवाईअखेरीच्या काळातील नाथसंप्रदायी कवी देवनाथ महाराजांचे हे जन्मगाव होय.
कुलकर्णी गो. श्री.