सिल्युरियन : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. काल विभागाला सिल्युरियन कल्प व त्या कल्पांत निर्माण झालेल्या खडकांच्या गटाला सिल्युरियन संघ म्हणतात. हा सु. ४२—४० कोटी वर्षांपूर्वीचा काळ आहे, असे मानतात. या संघाचे अध्ययन प्रथम सर रॉडरिक इंपी मर्चिसन या ब्रिटिश भूवैज्ञानिकांनी वेल्समधील खडकांवरून केले आणि रोमन लोक येण्यापूर्वी वेल्समध्ये राहणाऱ्या सिल्यूर नावाच्या लोकांवरून सिल्यूरियन हे नाव दिले (१८३९). मर्चिसन यांच्या व्याख्येत पुढे बदल करण्यात आला (१८७९). मर्चिसन यांनी वर्णन केलेल्या गटाच्या वरच्या भागालाच सिल्यरियन हे नाव ठेवून व खालच्या भागाला वेगळा कल्पून त्याला ऑर्डोव्हिसियन (सु. ४९–४२) कोटी वर्षांपूर्वीचा बदल मान्य झाला नाही. तेथील भूवैज्ञानिक ऑर्डोव्हिसियनला पूर्व (खालचा) सिल्यरियन व उरलेल्या भागास उत्तर (वरचा) सिल्युरियन म्हणतात. फ्रान्समध्ये व जर्मनीत उत्तर सिल्यरियनला गोटलँडियन म्हणतात. हे नाव स्वीडनच्या गोटलंड नावाच्या बेटावरून दिलेल् आहे. ब्रिटनमधील व्याख्येस अनुसरून येथील वर्णन केलेले आहे.

बहुसंख्य सिल्यरियन खडक समुद्रात तयार झालेले असून त्यांचे मृण्मय व वालुकामय असे दोन प्रमुख गट आढळतात. शिवाय चुनखडक व डोलोमाइट यांसारखे चुर्णीय खडकही आढळतात. क्वचित जमिनीवर तयार झालेले सिल्युरियन खडकही आढळतात.

ग्रॅप्टोलाइट, ट्रायलोबाइट व ब्रॅकिओपोडा हे या कल्पातील प्रमुख प्राणी होत. मृण्मय खडकांत ग्रॅप्टोलाइटांचे जीवाश्म (शिलाभूत झालेले जीवांचे अवशेष) सापडतात. त्यांचा भौगोलिक प्रसार विस्तृत आहे व सूचक जीवाश्म म्हणून त्यांच्या जीवाश्मांचा उपयोग होतो. ते ऑर्डोव्हिसियनमधील जीवांच्या प्रजातींपेक्षा भिन्न व मुख्यतः एकश्रेणी प्रकारांचे होते. वालुकामय खडकांत ब्रॅकिओपोडांचे, ट्रायलोबाइटांचे व इतर जीवाश्म आढळतात. पुष्कळसे ब्रॅकिओपोडा आर्टिक्युलाटांपैकी व थोडे इनार्टिक्युलाटांपैकी होते. ट्रायलोबाइटांच्या बऱ्याचशा प्रजातीही कल्पात होत्या. कल्पाचे विभाग करण्यासाठी ब्रॅकिओपोडांचा व ट्रायलोबाइटांचा उपयोग होतो.

प्रवाळांची व क्रिनॉइडियांची संख्या बरीच असे व चुनखडकांत त्यांचे विपुल अवशेष सापडतात. प्रवाळ व त्यांच्या जोडीने स्ट्रेमॅटोपोरॉइडिया व ब्रायोझोआ यांच्यामुळे निर्माण झालेल्या चुनखडकांच्या शैलभित्ती काही प्रदेशांत आढळतात. युरिप्टेरिड या विंचवासारख्या, परंतु समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांचे बरेचसे जीवाश्म मिळालेले आहेत. विंचवासारख्या प्राण्यांचेही जीवाश्म आढळले आहेत परंतु त्यांचे श्वसन हवेत होत असे की पाण्यात, याविषयी निर्विवाद पुरावा मिळालेला नाही. इतर अपृष्ठवंशींचे (पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांचे) जीवाश्म एकंदरित कमीच आढळतात. त्यांपैकी उल्लेखनीय म्हणजे सरळ कवचे असणारे नॉटिलॉइडिया होत.

पृष्ठवंशींपैकी (पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांपैकी) आदिम मत्स्यांचेच जीवाश्म सिल्युरियन खडकांत सापडलेले आहेत. सिल्युरियन संघाच्या माथ्याकडील थरात जमिनीवरील वनस्पतींच्या आदिम जातींचे जीवाश्म सापडलेले आहेत आणि या कल्पाच्या अखेरीस जमिनीवरील वनस्पती अवतरल्या, असे त्या जीवाश्मांवरुन दिसून येते.

सिल्युरियन कल्पाचे खडक सर्व खंडांत आढळतात परंतु उत्तर अमेरिका, यूरोप, उरल व उल्ताई पर्वत, नैर्ऋत्य चीन, पूर्व ऑस्ट्रेलिया व उत्तर आफ्रिका यांच्यातील खडकांविषयी अधिक माहिती आहे.

काश्मीरात स्पितीत, कुमाऊँ व म्यानमारमध्ये सिल्युरियन कल्पाचे जीवाश्ममय खडक आढळतात. हिमालयाच्या पंजाबातील रांगांत आढळणाऱ्या जीवाश्महीन मुथ क्वॉर्ट्‌झाइटांच्या गटाचा खालचा भाग सिल्युरियन कल्पातील असावा. अखेरच्या काळात तयार झालेल्या प्रॉडक्टस चुनखडकाचा पातळ थर आहे परंतु त्याच काळी जमिनीवर तयार झालेले खडक द्वीपकल्पाच्या अनेक भागांत आहेत [ ⟶ गोंडवनी संघ ].

या कल्पाच्या अखेरच्या काळात दक्षिणेकडील खंडाचे हवामान अतिशीत होते [ ⟶ पर्मियन].

पहा : ऑर्डोव्हिसियन ट्रायलोबाइट डेव्होनियन पुराजीव पुराजीवविज्ञान पुराप्राणिविज्ञान पुरावनस्पतिविज्ञान भूविज्ञान.

केळकर. क. वा.