सिंगापूर : सिंगापूर प्रजासत्ताक. आग्नेय आशियातील श्रीमंत वपर्यटकांचे आकर्षण असलेले एक द्वीप प्रजासत्ताक. हे मले द्वीपकल्पाच्यादक्षिणेस, हिंदी महासागरात १°  ९′ उ. ते १º २९′  उ. अक्षांश आणि१०३° ३८′पू . ते १०४°  ६′पू.रेखांश यांदरम्यान विस्तारलेले आहे.सिंगापूर या मुख्य बेटाशिवाय अन्य सु. ६३ लहान लहान बेटांचा याप्रजासत्ताकामध्ये समावेश असून देशाचे एकूण क्षेत्रफळ सु. ६८२चौ. किमी. ( सिंगापूर बेट ५७१·६ चौ. किमी.) आहे. देशाची लोकसंख्या ५१,८३,७०० (२०११ अंदाज) होती. सिंगापूर सिटी (लोक. ३७,८९,३००–२०११) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : देशातील सिंगापूर हे मुख्य बेट असून ते जोहोरच्या अरुंदसामुद्रधुनीने मले द्वीपकल्पापासून, तर नैर्ऋत्येकडील मलॅका सामुद्रधुनीनेइंडोनेशियाच्या सुमात्रा बेटापासून अलग झाले आहे. विषुववृत्ताच्याउत्तरेस सु.१३७ किमी.वर असलेल्या या द्वीपप्रजासत्ताकातीलसिंगापूर बेटाव्यतिरिक्त अन्य सु. ५४ द्वीपकांवर सांप्रत मानवी वस्तीआढळते. सिंगापूरशिवाय मोर्लीमाऊ, सेंतोसा, ऊबिन ही मोठी, तर ब्रानी,बूकूम, सांबोडा ही लहान बेटे महत्त्वाची आहेत. हा देशशांत झालेल्याभूकंपपट्ट्यात येतो. सिंगापूर हे सस.पासून सु. १५ मी. पेक्षाही कमीउंचीचे प्रमुख बेट असून त्याचा सु. ७५टक्के भूभाग चढउताराचाआहे. याच्या मध्यभागी लहान टेकड्यांची रांग पसरलेली असून बुकिततिमाह किंवा तिमाह हिल (१६५ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याचभागात सिंगापूर शहराच्या वायव्येस आहे. याशिवाय पँजंग व मंदाई हेउंच भाग आहेत. बेटाच्या पश्चिम व दक्षिण भागांमध्ये त्या मानाने कमीउंचीचे वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेले डोंगर आहेत. त्यांपैकी मौंटफॅबर हा प्रमुख आहे. बेटाचा पूर्व भाग कमी उंचीचा पठारी प्रदेश असूनया भागात झीज कार्यामुळे निर्माण झालेल्या दऱ्या आहेत. मध्य भागातीलटेकड्यांची रांग ग्रॅनाइट खडकांनी बनलेली असून पश्चिम व दक्षिणभागातील उंच प्रदेशवळ्यांचे आहेत. पूर्वेकडील पठारी प्रदेश वाळूमिश्रित अश्मरींचा आहे.

सिंगापूर बेटावर अनेक लहान लहान प्रवाह आहेत परंतु त्यांचे उतारमंद असल्याने त्यांना येणारे पूर हानिकारक ठरतात. अनेक उत्तरवाहीप्रवाहांच्या नदीमुखखाड्यांमध्ये दलदली निर्माण झालेल्या असून बेटाच्यामुख्य भूभागामध्ये त्यांचाविस्तार झाला आहे. या दलदली कच्छवनस्पतींनी व्यापल्या आहेत. सिंगापूर बेटावर क्रांजी, सेलेटर, पुंग्गोल,सेरंगून हे उत्तरवाही, तर जुराँग, कालांग हे दक्षिणेकडे वाहणारे मोठे प्रवाहआहेत. सिंगापूर नदी आग्नेयवाहिनी असून ती सिंगापूरशहराजवळसिंगापूर खाडीला मिळते. याशिवाय दानगा, मीलायू, किम किम इ. अन्यप्रवाह या बेटावर आहेत. सेलेटरुपर्स व माक्रितचे हे या बेटावरीलप्रमुख जलाशय आहेत.

हवामान : देशातील हवामान विषुववृत्तीय मोसमी प्रकारचे असूनउष्ण व दमट आहे. सिंगापूर बेटावरील जानेवारीचे तापमान २५° से.तर जून महिन्यातील तापमान २७° से. असते. जास्तीत जास्त ३६° से.पर्यंतच्या तापमानाची नोंद झालीआहे. येथे ठराविक काळात वर्षभरदररोज पाऊस पडतो. ईशान्य मॉन्सून वाऱ्यांच्या काळात (नोव्हेंबर–मार्च) येथेआर्द्रतेचे प्रमाण जास्त असते व जोरदार वारेही वाहतात.डिसेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण जास्त म्हणजे सु. २५ सेंमी. पर्यंतअसते. नैर्ऋत्य मॉन्सूनच्या काळात (मे –सप्टेंबर) पावसाचे व वाऱ्यांचेप्रमाण कमी असते. जुलैमध्ये सरासरी १७ सेंमी. पाऊस पडतो. एप्रिलव ऑक्टोबर महिन्यात स्थानिक वाऱ्यांपासून दुपारच्या वेळी पाऊसपडतो. एकूणच सिंगापूरचेवार्षिक सरासरी पर्जन्यमान २३८ सेंमी. आहे.

वनस्पती व प्राणी : मुख्य बेटावरील राखीव वर्षारण्यांचे भागवगळता येथील मूळच्या वनस्पती व मूळचे प्राणी यांचे प्रमाण खूपचकमी झाले आहे. पूर्वी सिंगापूरचा सु. ८५ टक्के प्रदेश जंगलव्याप्त होता परंतु वसाहतीकरणामुळे सांप्रत फक्त ५ टक्के भूभाग जंगलव्याप्त असूनतो सर्वसाधारणपणे तिमाह टेकडीच्या परिसरात आढळतो. त्याची देखभाल ‘तिमाह हिल नेचर रिझर्व्ह’ खात्यामार्फत केली जाते. मुख्यबेटाच्या वायव्य भागातील क्रांजी नदीच्या दलदलीच्या भागात मोठ्याप्रमाणावर कच्छ वनश्री आढळतात. लालांग या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या खुरट्या  वनस्पती सर्वत्र दिसून येतात. शोभेच्या वस्तूबनविण्यासाठी बाहेरुन आयात केलेल्या लाकडाचा वापर दिसून येतो.

सिंगापूरमध्ये जंगली श्वापदांचे प्रमाण खूपच कमी आहे. लांब शेपटीचीमाकडे, शेपूट नसलेले व मोठ्या  डोळ्यांचे निशाचर लेमूर, खवल्यांचेमुंगीखाऊ, कस्तुरी मांजर हे येथील मूळचे रहिवासी प्राणी आहेत. गळाव पाठ सोनेरी असलेले अनुक्रमे सनबर्ड व सुतारपक्षी, लांब शेपटीचाटेलर, हिरवा बक, पांढरा व रंगीत किंगफिशर इ. पक्षी येथे आढळतात.याशिवाय कोब्रा , विविध प्रकारचे सरडे व पक्षी येथे दिसून येतात. ‘सिकॅक’ या स्थानिक नावाने ओळखला जाणारा रंगहीन, बिनविषारीसरड्यासारखा लहान प्राणी हा येथे येणाऱ्या प्रवाशांचे आकर्षण असते.घराघरांतून तो पालीसारखा दिसून येतो. हा कीटक व डास भक्षकअसल्याने रहिवाशांच्या दृष्टीने तो उपयुक्त आहे. सागरकिनारी भागात प्रवालभित्ती, विविध प्रकारचे मासे आढळतात.

चौंडे, मा. ल.

 इतिहास व राज्यव्यवस्था : प्रागैतिहासिक काळापासून याबेटावर वस्ती असावी. या बेटाचा तुमसिक वा टेमासिक असा उल्लेखआढळतो. तेथे कोळ्यांची वस्ती होती आणि चाचेगिरी करणारे लोक राहत.इ. स. सातव्या शतकात सुमात्रामधीलपालेंबांग येथील श्रीविजय यासाम्राज्याचासिंगापूर हा एक भाग होता. त्यावेळी त्याचे नाव टेमासिकअसे होते. दक्षिण आशियातील व्यापाराचे ते एक मोठे केंद्र होते.पालेंबांग या राज्याचासँग नीला उतामा हा टेमासिकला आला होता. त्यालायेथे लाल रंगाचा, काळ्या डोक्याचा, घाऱ्या डोळ्यांचा, चट्टे-पट्टे असलेलाप्राणी दिसला. त्याला तो सिंह वाटला आणित्याने टेमासिक हे नावबदलून या बेटाला ‘सिंहापुरा’ हे नवीन नाव दिले. त्यावरुन सिंगापूर हेनाव प्रचलित झाले असावे.श्रीविजयच्या अधिपत्याखाली हे बेट चौदाव्याशतकापर्यंत होते. पुढे त्यावर जावाच्या मजपहित राजाची आणि त्यानंतरसयामी आयुथ्थ राजाची अधिसत्ता होती. पंधराव्या शतकात हे बेटमलॅका साम्राज्याच्याअधिपत्याखाली आले. त्यानंतर पोर्तुगीजांनी तेहस्तगत केले आणि त्यानंतर येथील सर्व बेटे डचांच्या अंमलाखालीआली (१७००). इ. स. १८१९ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचाप्रशासक सर स्टँफर्ड रॅफेल्स याने जोहोरच्या सुलतानाशी करार करुन हेबेट घेतले. त्यानंतर ते आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या हालचालींचेमध्यवर्ती स्थान बनले आणि हळुहळू याची भरभराट झाली. इ. स. १८६७मध्ये सिंगापूर हे ब्रिटिशांचे प्रशासकीय केंद्र झाले आणि त्यास ‘क्राउनकॉलनी’ चा दर्जा मिळाला. तेथून पिनँग, मलॅका आणि लाबूआन याप्रदेशांवर ब्रिटिश अधिसत्ता गाजवीत. सुएझ कालव्याचे उद्‌घाटन होताच(१८६९) बोटींच्या प्रवासास चालना मिळाली आणि सिंगापूरची वाढझपाट्याने झाली. त्या वेळी सिंगापूर हा ब्रिटिश मलेशियाचा एक भाग होता.तेथून मलेशियातील रबर व कथिल यांची निर्यात होत असे. १९२०–३०दरम्यान ब्रिटिशांनी नाविक दलाबरोबरच येथे विमान वाहतुकीचीउपयोजना केली. दुसऱ्या महायुद्घाच्या काळात जपानने हे बेट पादाक्रांतकेले (१९४२). जपानच्यापराभवानंतर (१९४५) पुन्हा ते ब्रिटिशांनीव्यापले. १९४६ मध्ये त्यांनी सिंगापूरला स्वतंत्र क्राउन कॉलनीचा दर्जादिला.१९५५ मध्ये सिंगापूरमध्ये पहिल्या स्वयंशासित संसदेचे प्रतिनिधीनिवडले गेले. १९५९ मध्ये सिंगापूरला अंतर्गतस्वयंशासनाचे अधिकारप्राप्त झाले परंतु परराष्ट्रीय धोरण आणि संरक्षण या बाबी ग्रेट ब्रिटनच्याअखत्यारीत राहिल्या.१९६३ मध्ये सिंगापूर एक घटकराज्यम्हणूनमलेशियाच्या सामील झाले परंतु आर्थिक व राजकीयसंघर्षामुळे हे संघराज्यफुटले आणि ९ ऑगस्ट १९६५ रोजी सिंगापूर हेस्वतंत्र प्रजासत्ताक झाले. स्वातंत्र्यानंतर सिंगापूरची आर्थिक भरभराटआणि लोकसंख्येची वाढ धीम्या गतीने होऊ लागली. १९७१ मध्ये ग्रेटब्रिटनने आपले सर्व लष्कर सिंगापूरमधून मायदेशी हलविले. त्यामुळेसंरक्षणासाठी सिंगापूरने न्यूझीलंड, मलेशिया यांची मदत घेतली आणिआपले संरक्षण दल तयार केले. सिंगापूर राष्ट्रकुल असोसिएशन ऑफसाउथ-ईस्ट एशियन नेशन्स आणि संयुक्त राष्ट्रे  यांचा सभासद आहे.

सिंगापूर हे स्वायत्त प्रजासत्ताक असून त्याचे १९५९ मध्ये पहिलेसंविधान बनविण्यात आले. त्यानंतर पुढे १९६३ व १९६५ मध्येसिंगापूरच्या राजकीय बदलानुसार घटनेत बदल झाले आणि तेथे पूर्णसंसदीय लोकशाही शासनपद्घती अस्तित्वात आली. संसद एकसदनी असूनतिचे ८४ सभासद (२००५) असतात. त्यांची दर पाच वर्षांनी प्रौढमताधिकाराने निवड केली जाते. प्रकृती अस्वास्थ्य वगळता मतदान हेसक्तीचे आहे. बहुमतातील पक्ष आपल्या नेत्याची (पंतप्रधानाची) निवडकरतो. तो कार्यकारी प्रमुख असतो. प्रौढ मताधिकारानेच राष्ट्राध्यक्षाचीनिवड केली जाते. तो देशाचा प्रमुख असून, त्याची सहा वर्षांसाठीनिवड केली जाते.

स्वातंत्र्योत्तर काळात १९६५ नंतर सिंगापूरमध्ये अँगकतान इस्लाम, बारीसन सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी व सिंगापूर डिमॉकॅटिक पार्टी यांसारख्याराजकीय संघटना अस्तित्वात आल्या. पण १९५९ पासून ली क्वॉन यूयाच्या नेतृत्वाखालील पीपल्स ॲक्शन पार्टी (पी. ए. पी.) या एकापक्षानेच सतत बहुमत मिळवून सत्ता आपल्या हाती ठेवली आहे(२००९). ली क्वॉन यू हा स्वतंत्र सिंगापूरचा पहिला पंतप्रधान वमुत्सद्दी (कार. १९५९–९०). त्याने आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीतसिंगापूरचा कायापालट केला. नंतर अंतर्गत कलहामुळे त्याला थोडाविरोध होऊ लागला होता. देशाचे एस्. आर्. नाथन हे राष्ट्राध्यक्ष वली त्सिन लूँग हे पंतप्रधान आहेत (२०११).

पी. ए. पी. ने राष्ट्रहितासाठी व्यवहार्य धोरण अंगीकारुन साम्यवादाससतत विरोध दर्शविला आहे. या पक्षाने १९८२ मध्ये नवीन संविधानतयार करुन पक्षाला राष्ट्रीय चळवळीचा प्रणेता असे अभिधान दिले.त्यामुळे लोकशाही शासनपद्घती असूनही देशात कल्याणकारी एकपक्षपद्घती अस्तित्वात आहे. सिंगापूरने अंतर्गत धोरणात व्यापार वपर्यटन यांवर भर देऊन शांतता व स्वास्थ यांचा पाठपुरावा केलाआणि परराष्ट्रीय धोरणात तटस्थता स्वीकारली आहे.

न्याय व संरक्षणव्यवस्था : देशातील न्यायव्यवस्था ‘ब्रिटिशकॉमन लॉ’ वर आधारित आहे. देशात सर्वोच्च न्यायालय आणि इतरदुय्यम न्यायालये असून सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत उच्चन्यायालय, अपील न्यायालये आणि फौजदारी अपील न्यायालये अंतर्भूतहोतात. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश व अन्य ११न्यायाधीश असतात (२०१०). मुख्य न्यायाधिशांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार करतात आणि मुख्य न्यायाधिशांच्यासल्ल्यानुसार राष्ट्राध्यक्ष इतर न्यायाधिशांची निवड करतात. १९७९च्या संविधान दुरुस्तीने न्यायिक आयुक्ताचे पद निर्माण करण्यात आले(१९८५). दुय्यम न्यायालयात जिल्हा न्यायालये, ट्रिब्यूनल कोर्ट,कोरोनर कोर्ट व बाल न्यायालये वगैरेंचा समावेशहोतो. त्यावरीलन्यायाधिशांची नेमणूक सर्वोच्च न्यायाधीश करतात. देशात १९७१ पर्यंतग्रेट ब्रिटनचे सैन्य होते, त्यामुळेसिंगापूरने संरक्षणाकडे फारसे लक्षपुरविले नाही. पुढे देशाने संरक्षण व्यवस्थेत लक्ष घातले. सर्व अठरावर्षांवरील पुरुषांना२४ महिन्यांची सक्तीची लष्करी सेवा असून२००५ मध्ये एकूण ७२,००० सैनिकांपैकी ५०,००० भूदल, ९,०००नाविकदलआणि १३,००० हवाईदलामध्ये होते. याशिवाय सैनिकीसमसंघटना दलात ८१,८०० सैनिक होते. याच वर्षी देशात नागरीसंरक्षणासाठी ८,५०० पोलीस होते. सिंगापूरने स्वसंरक्षणासाठीमलेशिया, ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडयांच्याबरोबर संरक्षणकरार केलेला आहे.

देशपांडे, सु. र.

आर्थिक स्थिती : सिंगापूरची अर्थव्यवस्था प्रामुख्याने उतारपेठेच्याउलाढालीवर विशेषत: आयात-निर्यात व्यापारावर अवलंबून आहे.जपानच्या खालोखाल हा देश आशिया खंडात व्यापारीदृष्ट्या अग्रेसरआहे. याशिवाय मच्छीमारी व पर्यटन या व्यवसायांमधून देशाला फारमोठे उत्पन्न मिळते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान आणि यूरोपयांतून आयात केलेला८० टक्के माल हा देश शेजारील देशांमध्येनिर्यात करतो. सिंगापूर कथिल आणि रबर मलेशियाकडून घेतो वम्यानमार वथायलंड देशांतून तांदूळ आयात करतो. सिंगापूर इराण, सौदीअरेबिया आणि अन्य देशांतून अशुद्घ खनिज तेल आयातकरतो आणिशुद्घतेल निर्यात करतो. त्यामुळे तेलशुद्घीकरणाच्या उद्योगास सिंगापूरमध्येचालना मिळाली आहे. बूकूम वसांबोडा ही बेटे या उद्योगासाठी प्रसिद्घआहेत. रबर आणि कथिल यांच्या व्यापाराचे सिंगापूर हे जागतिक केंद्रअसून ब्रानी बेट कथिल प्रगलन उद्योगात अग्रेसर आहे. उद्योगधंद्यासाठीसिंगापूरचा सेवाविभाग आर्थिक सहाय्य, वाहतूक व्यवस्था, परकीयचलन वगैरे सर्व प्रकारच्या सुविधा पुरवितो. सिंगापूरच्या मालकीचेतेलसाठे नसतानाही तेलशुद्घीकरण उद्योग क्षेत्रात तो जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेलशुद्घीकरण, जहाजबांधणी व दुरुस्ती, रसायने तयारकरणे, धातुउद्योग, अन्नप्रक्रिया, रबर, कापडउद्योग आणि इलेक्ट्रॉनिक वइलेक्ट्रिक उपकरणे यांचे उद्योगधंदे हे सिंगापूरचे वैशिष्ट्ये आहे. याकारखान्यांतून काम करण्यासाठी सिंगापूर शासनाने देशांतर्गत मजुरांचीव्यवस्था करण्याचे ठरविले आहे. येथे जहाजबांधणी उद्योग मोठ्याप्रमाणात चालतो. हे सर्व उद्योग सिंगापूर शहराच्या पश्चिमेस असलेल्याज्युराँगभागात प्रामुख्याने चालतात. देशातील एकूण क्षेत्राच्या फक्त१·४९ टक्के क्षेत्र शेतीसाठी वापरात असल्याने स्थानिक शेती उत्पादनफारच कमी निघते. त्यामुळे धान्य आयात करावे लागते. देशातील गरजआयात मालावर भागविली जाते. शेती तंत्रज्ञानातमोठी सुधारणा घडवूनत्याद्वारे ताजे अन्न मिळविण्यासाठी देश प्रयत्नशील आहे. इतर उत्पादनांमध्ये कोंबड्यांची अंडी (३५ टक्के), कोंबड्या (१·६ टक्के), बदके(२·४ टक्के) यांचा समावेश असतो. शहराचा विकास सिंगापूर बंदराभोवती झाल्याने त्या परिसरात अनेक गोद्या व गोदामे आढळतात. आयात-निर्यात प्रामुख्याने सिंगापूर बंदरातून होते. सिंगापूर हे करमुक्त बंदरव शहर असल्याने लाखो पर्यटक येथे खरेदीसाठी आकर्षिले जातात.सिंगापूरच्या व्यापारावर, कारखानदारीत व आर्थिक घडामोडींवर शासनाचेनियंत्रण असल्यामुळे देशात बेकारीचे प्रमाण अत्यल्प असून सामाजिकशिस्त आहे. सिंगापूरमध्ये ११५ व्यापारी बँका होत्या (२००४) वत्यांपैकी फक्त ५ स्थानिक बँका होत्या. बहुतेक बँका परदेशी असून बँकऑफ अमेरिका ही अग्रेसर आहे. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर हीसर्वांत मोठी स्थानिक बँक असून देशांतर्गत व्यापारास प्रोत्साहन देण्याततिचा सिंहाचा वाटा आहे. २००८ मध्ये भ्रष्टाचार विरोधी संघटनेने सादरकेलेल्या आंतरराष्ट्रीय पाहणी अहवालानुसार शासकीय कारभार आणिव्यापार यामध्ये कमीत कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांत सिंगापूरचाचौथा क्रमांक लागतो. १९९७ पासून देशाचा जगातील औद्योगिकीकरणझालेल्या देशांच्या गटात समावेश झाला आहे. सिंगापूर डॉलर हे देशाचेअधिकृत चलन असून ४३·९७ रु. = १ सिंगापूर डॉलर असा विनिमयदर होता (जुलै २०१२). येथे मेट्रिक परिमाण पद्घती वापरात असूनत्याशिवाय ताहिल, कॅती, पिकल इ. वजनमापे वापरात आहेत.

देशातील पर्यटन व्यवसाय भरभराटीस आला असून २००१ मध्येएकूण ७५,२२,२०० पर्यटकांनी सिंगापूरला भेट दिली. त्यात प्रामुख्यानेइंडोनेशिया, जपान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन, चीन, अ. सं.सं., तैवान इ. देशांतील पर्यटकांचे प्रमाण जास्त होते. यामुळे येथे हॉटेलव्यवसायही मोठ्या प्राणात विकसित झाला आहे.

वाहतूक व संदेशवहन : रस्त्यांचे दाट जाळे असलेल्या जगातीलकाही देशांपैकी सिंगापूर हा एक आहे. २००१ मध्ये कालांग – पायालेबा हा १२ किमी. लांबीचा द्रुतगती मार्ग बांधण्यास सुरुवात झाली.त्यातील सु. ९ किमी.चा मार्ग भुयारी होता. या द्रुतगती मार्गाचे काम२००७ मध्ये पूर्ण झाले. जोहोर खाडीवर १·१ किमी. लांबीचा पूलबांधण्यात आला असून रस्त्याने व लोहमार्गाने सिंगापूर बेट मले द्वीपकल्पाशी जोडण्यात आले आहे. मलेशियाच्या जोहोर भागातून गोडेपाणीनळांद्वारे या पुलावरुन देशात आणण्यात आले आहे. २००९ मध्येदेशात ३,३५६ किमी. लांबीचे १०० टक्के रस्ते पक्के डांबरी होते.याच वर्षी देशात ४,०४,२७४ खाजगी मोटारगाड्या, १२,७०७ बसगाड्या व १,३१,४३७ मोटारसायकली व स्कूटर होत्या. १९९० च्यादशकात सिंगापूर सरकारने बेटावरील दाट लोकसंख्येचे प्रदेश, व्यावसायिक व औद्योगिक प्रदेश आणि मुख्य बंदर यांना जोडणारा छोटारेल्वेमार्ग सुरु केला. सांप्रत जोहोर खाडीवरील पुलाद्वारे सिंगापूर व मलेद्वीपकल्पएकमेकांशी २५·८ किमी.च्या लोहमार्गाने जोडण्यात आलेआहेत. याशिवाय जलद वाहतुकीसाठी मुख्य बेटावर ८९·४ किमी.लांबीची मेट्रो रेल्वे सुरु करण्यात आली आहे. २००३ मध्ये सुरुकरण्यात आलेली २० किमी. लांबीची नॉर्थ-ईस्ट हीसंपूर्ण स्वयंचलितअसलेली जगातील पहिली अवजड मेट्रो रेल्वे मानली जाते. सिंगापूरचाचांग्यी हा आंतरराष्ट्रीयविमानतळ १९८१ मध्ये वापरात आला. तोबेटाच्या पूर्व भागात असून प्रादेशिक विमानतळ म्हणूनही वापरात आहे.समुद्रहटवून अनेक हेक्टर कृत्रिम जमीन तयार करुन त्यावर हा अत्याधुनिकविमानतळ उभारण्यात आला आहे. सेलेटरयेथील विमानतळ हवाईप्रशिक्षणासाठी वापरला जातो. सिंगापूर एअरलाईन्सद्वारा आंतरराष्ट्रीयहवाई वाहतूक चालते.

सिंगापूर हे जगातील एक गजबजलेले अत्यंत सुरक्षित बंदर आहे.येथून जगभरातील अनेक देशांशी मोठ्या बोटींद्वाराव्यापार चालतो. याबंदराजवळ समुद्र खोल असून ९३ चौ. किमी. क्षेत्रात बंदराचा विस्तारआहे. द पोर्ट ऑफ सिंगापूरऑथॉरिटीद्वारा या वाहतुकीचे नियोजन केलेजाते. २००१ मध्ये सिंगापूर बंदरातून ३,३५३ जहाजांनी वाहतूककेली. यामुख्य बंदराशिवाय या ऑथॉरिटीमार्फत देशातील तँजाँगपागर, केपल, ब्रानी, पसीर पांजांगऊ सेम्बावांग व जुराँग या अन्यबंदरातील वाहतुकीचे नियोजन केले जाते.

सिंगापूरमध्ये २००५ मध्ये ६२,२९,००० दूरध्वनी (भ्रमणध्वनींसह)संच होते. २००७ मध्ये देशातील सु. ६८ टक्के लोक महाजालकसेवेचा लाभ घेत होते. द टेलिकम्युनिकेशन ऑथॉरिटी ऑफ सिंगापूरद्वाराही सेवा नियंत्रित केली जाते. देशात डाक सेवाही मोठ्या प्रमाणातकार्यरत आहे. द मिडिया डेव्हलपमेंटऑथॅरिटी ऑफ सिंगापूर हेदेशातील मुख्य प्रक्षेपण प्राधिकरण असून २००६ मध्ये देशात १३·८ लक्षदूरचित्रवाणी संच होते. २००१ मध्ये सिंगापूरमध्ये १३१ चित्रपटगृहेहोती. तर याच वर्षी देशात ४ भाषांतून १० दैनिके प्रसिद्घ होत होती.दैनिकांचा एकूण रोजचा खप १५·९ लक्ष प्रतीचा होता.द नॅशनललायब्ररी बोर्ड ३ जुलै १९९६ रोजी कार्यान्वित झाले असून येथेयेणाऱ्या पर्यटकांना व स्थानिकांना योग्य संदर्भ वसेवा पुरविणे हेत्याचे उद्दिष्ट असते. २००३ मध्ये राष्ट्रीय ग्रंथालयाव्यतिरिक्त देशात२ प्रादेशिक व ४० अन्य ग्रंथालये होती. देशात अनेक संग्रहालये आहेत.

लोक व समाजजीवन : ब्रिटिशांनी १८१९ मध्ये या बेटावरव्यापारी ठाणे उभारले. त्यावेळी येथे फक्त मासेमारी करणाऱ्या मलेलोकांची व गँबिअर वनस्पतींची (कात तयार करण्यास लागणारी)लागवड करणाऱ्या चिनी लोकांची वसती होती. त्यानंतर मात्र याभागातील लोकसंख्येत व्यवसाय व कामधंद्याच्या निमित्ताने आलेल्याइतर देशांतील आप्रवाशांची संख्याझपाट्याने वाढली. जगातील लहानबेटांपैकी सिंगापूर हे अत्यंत दाट लोकसंख्या (७,२५७ दर चौ. किमी.)असलेले बेटमानले जाते (२०११). येथील लोकांमध्ये सु. ७५ टक्केचिनी आहेत. त्याखालोखाल मलायी व भारतीयांची (विशेषतःतमिळनाडूव केरळमधील) संख्या दिसून येते. यांशिवाय पाकिस्तानी, श्रीलंकन,अरब, ज्यू, यूरेशियन, पार्शी इ. लोकदिसून येतात. सिंगापूर शासनानेसांप्रत अनेक निर्बंध घालून आप्रवाशांच्या स्थायिक होण्यावर नियंत्रणआणले आहे.बहुतेक चिनी लोक भाजीपाल्याची शेती, डुकरे व कोंबड्यापाळणे इ. व्यवसाय करतात. व्यापार-उद्योगधंद्यामध्ये विशेषतः कापड-उद्योग व घरगुती वस्तूंच्या व्यवसायांत तसेच बांधकाम व रस्त्यांच्याप्रकल्पांमध्ये भारतीय दिसतात. अन्य व्यवसाय वा पोलीस दलामध्येपाकिस्तानी, तर कायदा व वैद्यक क्षेत्रांत तसेच शासकीय सेवा वमौल्यवान वस्तूंच्या व्यवसायातश्रीलंकन व यूरोपीय दिसतात. शासकीयकार्यालये, पोलीस दल, कारखानदारी, बांधकाम व्यवसाय, मत्स्योद्योग इ.मध्येमलेशियन लोक गुंतलेले आहेत. लोकसंख्येतील विविधतेमुळेदेशात धार्मिक विविधता आढळते. देशात २००१ मध्ये एकूण लोकसंख्येच्या ४१ टक्के बौध्द व ताओ, १२ टक्के मुस्लिम, ११·७ टक्के ख्रिश्चन, ३·२ टक्के हिंदू व बाकीचे अन्य धर्मीय होते. या धार्मिकविविधतेमुळे देशात अरबी पद्घतीच्या मशिदी, रंगीत ड्रॅगन असलेलीआणि उत्कृष्ट एनॅमल व नक्षीकाम केलेली चिनीमंदिरे, दाक्षिणात्यपद्घतीची हिंदू मंदिरे, गॉथिक चर्चे, सिनॅगॉग इ. विविध स्थळे आढळतात. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात ‘लूनार न्यू यिअर’ हा सार्वत्रिकमहोत्सव साजरा केला जातो. याशिवाय प्रत्येक धर्माचे लोक आपआपल्या पद्घतीने सण साजरे करतात. श्रीमंत असूनही सर्वप्रकारचे कष्टकरणे व साधे राहणीमान ही येथील लोकांची वैशिष्ट्ये दिसतात. देशातकलेच्या विकासासाठी ‘द नॅशनल आर्ट्‌स कौन्सिल’ ची १९९१ मध्येस्थापना करण्यात आली आहे. येथील बाजारपेठांमध्ये चिनी, इंडोनेशियनव मलेशियन कलात्मक वस्तूंचा भरणा मोठ्या प्रमाणात दिसतो. चिनीमातीची भांडी, स्नफ बाटल्या, दागिने, गालिचे, लाकडी वस्तू यांचात्यात समावेश असतो. बाटिक कलाकाम केलेले कपडे, कापडतसेच विविध आकाराच्या छत्र्या, हॅट ही स्थानिक वैशिष्ट्ये दिसतात.सिंगापूर हँडिक्राफ्ट सेंटर, सेराँगन रोड, अरब स्ट्रीट, चायनाटाऊन इ. भागखरेदीदारांची आकर्षण ठिकाणे आहेत. अनेक परदेशी पर्यटक येथेयेत असल्याने देशात विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्याआहेत. २००१ मध्ये सिंगापूरमध्ये २७ रुग्णालये व त्यांमध्ये ११,८९७खाटांची सोय होती. त्याच वर्षी देशात ५,७४७ डॉक्टर, १,०८७दंतवैद्य, १७,३९८ परिचारिका आणि १,१४१ औषधनिर्माते होते.

सिंगापूरची शिक्षण व्यवस्था ग्रेट ब्रिटनच्या धर्तीवर असून प्राथमिकशिक्षण वयाच्या सहाव्या वर्षापासून सुरु होते व ते सक्तीचे आहे. देशात२०११ मध्ये ९६·१ टक्के लोक (पुरुष ९८·१ टक्के व महिला ९४·१टक्के) साक्षर होते. येथील १९४ प्राथमिक शाळांमध्ये ३,०२,७३३विद्यार्थी व १२,०११ शिक्षक, १६२ माध्यमिक शाळांमध्ये १,८७,८५८विद्यार्थी व ९,४९१ शिक्षक, तर १७ कनिष्ठ महाविद्यालये व तत्समसंस्थांमध्ये २४,५८२ विद्यार्थी व १,८६९ शिक्षक होते (२००१). त्याचवर्षीदेशात तीन विद्यापीठे असून नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (स्था. १९०५) मध्ये ३२,०२८ विद्यार्थी शिक्षण घेत होते. याशिवायनान्यांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (स्था.१९९१) आणि सिंगापूरमॅनेजमेंट युनिव्हर्सिटी (स्था. २०००) ही अन्य दोन विद्यापीठे आहेत.द इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनही एकमेव शिक्षक-प्रशिक्षण संस्थाअसून प्रौढ शिक्षण मंडळ व औद्योगिक प्रशिक्षण मंडळे देशात आहेत.देशात १९६७ मध्ये सायन्स कौन्सिलची स्थापना करण्यात आलीआहे. सिंगापूरमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, गोल्फ,घोड्यांच्या शर्यती, पोलो, पोहण्याच्या व सायकल शर्यती इ. खेळलोकप्रिय आहेत. त्यांच्या विकासासाठी अनेक क्रीडाक्लब येथे आहेत.

देशात मले (राष्ट्रभाषा), चिनी (मँडरीन), तमिळ व इंग्रजी याअधिकृत भाषा असून इंग्रजी ही प्रशासकीय भाषा आहे.

प्रेक्षणीय स्थळे : चकचकीत स्वच्छ रस्ते, गगनचुंबी अनेक मजलीइमारती, सौम्य आल्हाददायक हवामान, अनेक बागा आणि करमुक्तबाजारपेठ, यांशिवाय भव्य उपहारगृहे, निवास व्यवस्था, दुकाने, मोनोरेल, संगीतावरील कारंजी इत्यादींमुळे सिंगापूर हे पर्यटकांचे तसेच खरेदीदारांचेआकर्षण बनले आहे. देशातील सर्वांत सुरम्य स्थान म्हणजे सेंतोसा बेट.या बेटावर फेरी बोटीने अथवा केबलकारने जाता येते. दुसऱ्या महायुद्घकाळात जपानने सिंगापूर व्यापले तेव्हा या बेटावर ब्रिटिशांचा लष्करीतळ होता. ब्रिटिश सत्ता संपल्यानंतर सिंगापूर शासनाने बेटाचा कायापालटकेला आहे. याबेटावर गोल्फ मैदान, पोहण्याचे तलाव, टेनिस कोर्ट असूनयाचा पूर्व किनारा शंख-शिंपले, प्रवाळ, पुळणी, विविधप्रकारचे मासेयांसाठी प्रसिद्घ आहे. याच्या पश्चिम भागात १८८० मधील किल्ला आहे.शिवाय येथे अनेक संग्रहालये असूनत्यांपैकी आर्ट सेंटर व सरंडर चेंबरप्रसिद्घ आहेत. कूसूबेट जुन्या चिनी मंदिरांसाठी व मुस्लिम धार्मिकठिकाण म्हणूनप्रसिद्घ असून दरवर्षी येथे ऑक्टोबर महिन्यातील ‘कूसू सीझन’ साठीपर्यटकांची गर्दी असते. येथील पुळणी व कासवाचेअभयस्थान प्रसिद्घ आहे. सिंगापूर बेटावरील ‘जुराँग बर्ड पार्क’ विविधरंगी आणि विविध प्रकारचे सु. ७,००० पक्ष्यांचे प्रकार असूनत्यांच्या बहुढंगी कसरतीही येथे पहावयास मिळतात. येथील एकाभुयारात अंटार्क्टिकची प्रतिकृती तयार केलेली असून तेथे बाराहीमहिने हिमखंडातून मुक्तपणे संचार करणारे पेंग्वीन पहावयास मिळतात.सिंगापूरचा विविध प्रकारच्या सुसरी-मगरींचा ‘क्राकोडाइल फार्म’ प्रसिद्घ आहे. येथील प्राणिसंग्रहालयात हत्ती, गोरिला, जिराफ, झेब्रा, वाघ, सिंह इ. सर्व प्रकारचे प्राणी आहेत. लहान मुलांसाठी सिंगापूरमध्येअमेरिकेतील डिझ्निलँडसदृश ड्रॅगन वर्ल्ड नावाची जादूनगरी बनविलीआहे. तेथील धबधबे प्रेक्षणीय आहेत. सिंगापूरमधील चायना टाउन हाभाग छोटा चीन मानला जातो. येथे चिनीसंस्कृतीचे दर्शन घडते.शहरातील व्हिक्टोरिया मिमॉरिअल हॉल, रॅफेल्स हॉटेल, उच्च न्यायालयाची इमारत, नगरभवन वद हाउस ऑफ जेड यांच्या इमारती भव्यअसून लक्षणीय आहेत. यांशिवाय सिंगापूरमध्ये हिंदूंची अनेक मंदिरेअसूनत्यांपैकी सेरंगून रस्त्यावरील पेरुमल्ल आणि टँक रोडवरील चेट्टियारतसेच मरिअम्मन मंदिरे प्रेक्षणीय आहेत. याशिवायसुलतान मॉस्कसेंट अँड्र्यू कॅथीड्रेल (१८६२), अनेक चिनी धार्मिक ठिकाणे, नॅशनलथिएटर, सिंगापूर हँडिक्राफ्ट सेंटर, रॅफेलचा पुतळा, तिलोक अय्यरमार्केट, व्हान क्लिफ अक्वेअरिअम्, कॅसिनो इ. अनेक पर्यटकांचीआकर्षणे आहेत. सिंगापूरच्या वनस्पतिउद्यानाने ३१ हे. क्षेत्र व्यापलेलेअसून त्यात पाच लाख प्रकारच्या वनस्पतींच्या जातीचे नमुने आढळतात.यांशिवाय मँडाई ऑर्चिड गार्डन्स, झोऑलॉजिकल गार्डन, पक्षी उद्यानातील मानवनिर्मित ३० मी. उंचीचा धबधबा इ. पर्यटनस्थळे प्रसिद्धआहेत. विविध धर्म, वर्ण, वंश आणि बोलीभाषा असूनही देशातएकात्मता दिसून येते. ( चित्रपत्रे ).

चौंडे, मा. ल.

सिंगापूर