पनिहाटी: प. बंगाल राज्याच्या चोवीस परगणा जिल्ह्यातील एक शहर, कलकत्त्याचे उपनगर व तांदळाचे प्रमुख व्यापारकेंद्र. लोकसंख्या १.४८,०४६ (१९७१). हे कलकत्त्याच्या उत्तरेस १३·६ किमी. हुगळी नदीच्या डाव्या तीरावर वसले असून हे कलकत्त्याशी लोहमार्गाने व रस्त्याने जोडलेले आहे. येथे १९०० पासून नगरपालिका असून शाळा, दवाखाने इ. सोयी तसेच चर्च व महिला अनाथाश्रम आहे. रसायने, मातीची भांडी, काच, रंग, सिमेंट, रबरी वस्तू, हातमागावर कापड विणणे इ. उद्योग चालतात. 

पवार. चं. ता.