डहाणू : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ९,६३७ (१९७१). हे मध्य रेल्वेच्या मुंबई–बडोदे लोहमार्गावर डहाणू रोड स्थानकापासून ३ किमी., मुंबईपासून १२५ किमी. आहे. डहाणू खाडीच्या उत्तर तीरावर छोटासा किल्ला असून तो पोर्तुगीजांनी बांदला असावा. हे लहानसे बंदर असून येथे लाकडाचा व्यापार व मासेमारी चालते. हे महत्त्वाचे वनकेंद्र असून येथील फळांच्या व भाजीपाल्याच्या बागा प्रसिद्ध आहेत.

सावंत, प्र. रा.