श्रीराम मंदिर, चाफळ.

चाफळ : सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील मांड नदीकाठी वसलेले ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र. लोकसंख्या ३,८४८ (१९७१). हे उंब्रजच्या पश्चिमेस सु. १० किमी. असून समर्थ रामदासांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. समर्थांनी अंगापूरच्या डोहात सापडलेल्या मूर्तीची येथे स्थापना केली. तेव्हापासून दर रामनवमीस येथे मोठा उत्सव साजरा होतो. येथील मंदिरांचा अलीकडे पुनरुद्धार करण्यात आला असून चाफळला महाराष्ट्र शासनाने पर्यटनकेंद्र म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार अनेक योजना कार्यान्वित होत आहेत.

कुलकर्णी, गो. श्री.