साउथ सूदान : पूर्व आफ्रिकेतील एक नवनिर्मित प्रजासत्ताकराष्ट्र. आफ्रिकेतील चोपन्नावा तर जगातील एकशेत्र्याण्णव्वा नवोदितदेशम्हणून ९ जुलै २०११ रोजी साउथ सूदान उदयास आला आहे.हा खंडातर्गत देश असून याच्या उत्तरेस सूदान, पूर्वेस इथिओपिया, आग्नेयीस केन्या, दक्षिणेस युगांडा, नैर्ऋत्येस डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफद काँगो व पश्चिमेस मध्य आफ्रिका प्रजासत्ताक देश आहे. याचा अक्षवृत्तीयविस्तार ३° ते १३° उत्तर अक्षांश आणि रेखावृत्तीय विस्तार२४° ते ३६° पू. रेखांश यांदरम्यान आहे. देशाचे क्षेत्रफळ ६,१९,७४५चौ. किमी. व लोकसंख्या ८२,६०,४९० (२०११) आहे. जूबा हेदेशाच्या राजधानीचे ठिकाण तसेच देशातील सर्वांत मोठे शहर आहे. 

भूवर्णन : साउथ सूदानची भूमी उष्णकटिबंधीय अरण्ये, दलदलव गवताळ प्रदेशाने व्यापलेली आहे. देशाच्या साधारणपणे मध्यातूनदक्षिणोत्तर वाहणारी श्वेत नाईल नदी राजधानी जूबाजवळून वाहत जाते.नाईल या जगातील सर्वांत लांब नदीचे वरदान या देशाला लाभले आहे.श्वेत नाईल नदीमुळे निर्माण झालेला सूढ येथील हा विस्तृत दलदली प्रदेशबाहर एल् जेबेल या स्थानिक नावाने ओळखला जातो. नाईल व तिच्याउपनद्यांनी तयार केलेला पूरमैदानाचा भाग यात आहे. नाईल नदी हासाउथ सूदानचा सर्वांत महत्त्वाचा भौगोलिक घटक आहे. नाईलला येथेबाहर एल् जेबेल (पर्वतसरिता) या नावानेही ओळखले जाते. पावसाळ्यातदक्षिणेकडील प्रदेश जलमय होऊन तेथे दलदली वनस्पती, उंच गवतआणि विशेषतः सूद नावाचे लव्हाळ्यांसारखे पपायरस गवत यांचीभरमसाठ वाढ होते. या देशाच्या युगांडा, केन्या व इथिओपियाशीअसलेल्या सरहद्दींदरम्यान पर्वतीय श्रेण्या आढळतात. 

हवामान : उष्णकटिबंधीय प्रदेशात असल्याने साउथ सूदानचेहवामान उष्णकटिबंधीय खंडांतर्गत प्रकारचे आहे. वर्षभर तापमान अधिकअसून मे व जून मध्ये ते सर्वाधिक असते. जूबा येथे जानेवारीचेतापमान २८.३° से., जुलैचे तापमान २५.६° से. तर वार्षिक सरासरीपर्जन्यमान ९७ सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी : साउथ सूदानमधील संरक्षित अरण्ये, गवताळप्रदेश, अधिक उंचीची पठारे व भृगु प्रदेश, वृक्ष व गवतयुक्त सॅव्हानाप्रदेश, पूरमैदाने व आर्द्रभूमी ही प्राण्यांच्या अधिवासाची प्रमुख क्षेत्रेआहेत. पूर्वेस इथिओपियाच्या सरहद्दीजवळील बोमा नॅशनल पार्क, सूद, आर्द्रभूमी, काँगोच्या सरहद्दीजवळील सदर्न नॅशनल पार्क या प्रदेशांतहरिण (कोब, टोपी इ.) रानरेडे, हत्ती, जिराफ, सिंह, काळवीट, रानडुक्कर, आफ्रि कन रानटी कुत्रे, चिंपँझी, माकडे इ. प्राण्यांची प्रचंड संख्या आहे.बुरशीचे असंख्य प्रकार येथे आढळतात. 

इतिहास : साधारणपणे इ. स. दहाव्या शतकापूर्वी दिनका, न्यूअर, शिलूक या निलोटिक लोकांचे आणि इतरांचे साउथ सूदानमध्ये आगमनझाले. पंधराव्या ते एकोणिसाव्या शतकांदरम्यान प्रामुख्याने बाहर एल्.गॅझॅल प्रदेशातील स्थलांतरित जमातींनी या लोकांना त्यांच्या सांप्रतस्थळी आणले. अझांडे हे अनिलोटिक लोक सोळाव्या शतकातसूदानमध्ये आले असून त्यांनी या प्रदेशातील सर्वांत मोठी राज्ये स्थापनकेली. अझांडे हा साउथ सूदानमधील सर्वांत मोठा वांशिक गट आहे.अझांडे लोक प्रामुख्याने वेस्टर्न इक्वेटोरिया व वेस्टर्न बाहर एल् गॅझॅल-मधील उष्णकटिबंधीय वर्षारण्यांच्या प्रदेशात आढळतात. अठराव्याशतकात या प्रदेशात आलेल्या अवुंगरा लोकांनी लागलीच अझांडेवरआपले वर्चस्व प्रस्थापित केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस येथेब्रिटिशांचे आगमन होईपर्यंत अवुंगरांची सत्ता निर्विवाद राहिली. भौगोलिकअवरोधामुळे साउथ सूदान इस्लामच्या विस्तारापासून सुरक्षित राहिला.त्यामुळे साउथ सूदानी लोकांना आपला सामाजिक व सांस्कृतिक वारसातसेच त्यांच्या राजकीय व धार्मिक संस्था अबाधित राखता आल्या.त्यांचा राजा ग्बूद्वे याच्या विस्तारवादी धोरणामुळे अठराव्या शतकातअझांडे लोकांचे शेजारील मोरो, मुंडू, पॉजूलू व बाहर एल् गॅझॅलमधीललहान गटांशी तणावाचे संबंध राहिले. एकोणिसाव्या शतकात आपलेस्वातंत्र्य टिकविण्यासाठी अझांडे लोकांना फ्रेंच, बेल्जियन व महदिस्टलोकांशी लढत रहावे लागले. खेदिव्हे इस्माईल पाशा याच्या नेतृत्वाखालीईजिप्तने १८७० च्या दशकात पहिल्याच प्रयत्नात या प्रदेशावर ताबामिळविला आणि दक्षिणेकडील भागात इक्वेटोरिया प्रांताची स्थापनाकेली. ईजिप्तने या प्रदेशात गव्हर्नरपदी सॅम्युएल बेकर (१८६९), चार्लस्जॉर्ज गॉर्डन (१८७४) व एमिन पाशा (१८७८) यांची नेमणूक केली.१८८० च्या दशकातील महदिस्ट बंडकाळात या प्रांतात अस्थिरतानिर्माण झाली. १८८९ मध्ये इक्वेटोरिया हे ईजिप्तच्या मोर्च्याचे ठाणेबनले. लाडो, गाँडोकोरो, ड्यूफाईल व वाडेलाई ह्या इक्वेटोरियामधीलप्रमुख वसाहती होत्या. साउथ सूदान युगांडाशी जोडले जावे अशीब्रिटिशांची अपेक्षा होती (१९४७) परंतु जूबा कॉन्फरन्सने हे धोरणमोडीत काढून दोन्ही सूदान एकत्रित ठेवण्याच्या बाजूने कौल दिला.

ईजिप्त व ब्रिटनच्या पारतंत्र्यात असलेल्या सूदान या देशाने १ जानेवारी१९५६ रोजी स्वातंत्र्य प्राप्त केले. स्वातंत्र्योत्तर काळात उत्तर व दक्षिणसूदानमध्ये राजकीय, धार्मिक, वांशिक आणि आर्थिक मुद्यांवरून १९५५ते १९७२ आणि १९८२ मध्ये यादवी झाली. उत्तरेत मुस्लिमांचे तरदक्षिणेत ख्रिश्चन धर्मीयांचे प्राबल्य आहे. साउथ सूदानला स्वायत्ततादेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ही यादवी थांबली. १९७२ मध्ये साउथसूदान हा स्वायत्त प्रदेश बनला त्यानंतर पुन्हा दुसरी यादवी सुरू झाली.कर्नल ओमर अल् बशीर यांनी १९८९ मध्ये देशाची सूत्रे हाती घेतलीआणि स्वतःला अध्यक्ष घोषित केले परंतु दक्षिण आणि उत्तरेत संघर्षसुरूच राहिला. पुढे २००५ मध्ये सर्वसमावेशक शांतता करार होऊन हीयादवी संपुष्टात आली. त्यानंतर साउथ सूदानमध्ये स्वायत्त शासनाचीस्थापना करण्यात आली. १९७२-८३ तसेच २००५ ते ८ जुलै२०११ या कालावधीत साउथ सूदानमध्ये ‘गव्हर्नेंट ऑफ सदर्न’हेसूदान शासन होते. 

दोन्ही यादवी युद्घांचे या प्रदेशावर अनेक गंभीर दुष्परिणाम झाले.प्रदेशाच्या विकासाला खीळ बसली. २.५ द. ल. पेक्षा अधिक लोकत्यात मारले गेले. ५ द. ल. पेक्षा अधिक लोकांनी देशाबाहेर तर इतरांनीदेशांतर्गत स्थलांतर केले. असंख्य लोक निर्वासित बनले. साउथ सूदानलास्वातंत्र्य देण्याच्या मुद्यावर सार्वत घेण्यात आले. ९ ते १५ जानेवारी२०११ या कालावधीत घेतलेल्या सार्वत्रिक जनमत चाचणीमध्ये ९८.८३टक्के लोकांनी साउथ सूदानच्या स्वातंत्र्याच्या बाजूने कौल दिला. उत्तरेकडेराहणाऱ्या तसेच देशांतर करून गेलेल्या लोकांनीही या मतदानात भागघेतला होता. ३० जानेवारी २०११ रोजी ह्या जनमत चाचणीचा निकालजाहीर करण्यात आला. सूदानचे अध्यक्ष बशीर यांनी जनमत कौल मान्यकेला. अखेर ९ जुलै २०११ रोजी सूदान या देशाची अशी फाळणीहोऊन साउथ सूदानच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.सूदानची (उत्तरेकडील) राजधानी खार्टूम असून साउथ सूदानची राजधानीजूबा आहे. साउथ सूदान स्वतंत्र झाला असला, तरी सूदानबरोबरचे त्याचेकाही वादविवाद व प्रश्न अनुत्तरित आहेत. साउथ सूदानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संघटना आणि सूदानचे लष्कर यांच्यात झालेल्यासंघर्षामुळे नव्या देशाची भविष्यकालीन वाटचालही सोपी नसेल, हे स्पष्टझाले आहे. साउथ सूदानाला लागून असलेल्या कोर्दोफॅन राज्यातील ‘अबेयी’परिसरासाठी अद्यापही दोन्ही बाजूंचा संघर्ष चालू असून साउथसूदानने त्यावरील आपला दावा कायम ठेवल्यास त्यास सूदान मान्यतादेणार नाही, असा इशारा बशीर यांनी दिला आहे. अबेयीमधील लोकांनाउत्तर की दक्षिण सूदानमध्ये सामील व्हावयाचे आहे यावर सार्वमतघेण्यात येणार आहे. अबेयीचा ताबा आज उत्तर सूदानच्या हाती आहे.सूदानी लष्कर व सूदान पीपल्स लिबरेशन आर्मी (एस पी एल ए)यांच्यात जून २०११ मध्ये न्यूबा पर्वतावर साउथ-कोर्दोफॅन संघर्षउफाळला होता. काही वांशिक संघर्षही तीव्र स्वरुपाचे आहेत. जाँग्लेई राज्यात अशी परिस्थिती असून त्याचा त्रास मुर्ले जमातीला झालाअसल्याचे सन २००९ च्या मानवी हक्क पाहणी अहवालात नमूद केलेआहे. देशातील दहा राज्यांपैकी नऊ राज्यांत सात सशस्त्र गट शासकीयधोरणाच्या विरोधात कार्यरत आहेत. खनिज तेलाचे सु. ८० टक्के उत्पादनसाउथ सूदानमधून मिळते. तेलाच्या महसूलाच्या वाटपाचा प्रश्न अद्यापसुटलेला नाही. 


राजकीय स्थिती : साउथ सूदानच्या स्वातंत्र्यापूर्वी फक्त दोन दिवसआधी (७ जुलै २०११) ‘सदर्न सूदान लेजिस्लेटिव्ह असेंब्ली’ने (सध्या अस्तित्वात नाही) देशाच्या संविधानास अंतरिम मंजुरी दिली.या संविधानावर स्वातंत्र्याच्या दिवशी (९ जुलै २०११) राष्ट्राध्यक्षांनीस्वाक्षरी केल्याने ते अंमलात आले. सन २००५ च्या अंतरिम संविधानाच्याजागी आलेले हे संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्चकायदा आहे. यासंविधानानुसार मिश्र अध्यक्षीय शासन पद्घतीचा स्वीकार करण्यात आलाआहे. राष्ट्राध्यक्ष हा देशाचा, शासनाचा तसेच लष्कराचा प्रमुख असतो.येथे द्विगृही राष्ट्रीय विधानमंडळ असून त्यांपैकी पहिल्या गृहातील राष्ट्रीयविधानसभेचे सदस्य प्रत्यक्ष मतदानाने निवडून आलेले असतात, तर राज्यसभा या दुसऱ्या गृहातील सभासद हे राज्यांचे प्रतिनिधी असतात.सूदान पीपल्स लिबरेशन मूव्हमेंट (एस पी एल एम) चे नेते जॉन गरांगहे आपल्या मृत्यूपर्यंत (३० जुलै २००५) स्वायत्त शासनाचे राष्ट्राध्यक्षहोते व एस पी एल एम चे उपाध्यक्ष सलवा कीर मायार्दित हे सूदानचेपहिले उपराष्ट्राध्यक्ष होते. ११ ऑगस्ट २००५ मध्ये कीर मायार्दितयांनी साउथ सूदानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. वैधानिक सत्ताशासन व एकसदनी ‘साउथ सूदान लेजिस्लेटिव्ह’असेंब्लीकडे असते.संविधानाने स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था दिलेली आहे. 

साउथ सूदानमध्ये दहा राज्ये असून ती बाहर एल् गॅझॅल, इक्वेटोरियाव ग्रेटर अपर नाईल यांतील ऐतिहासिक प्रांतामध्ये विभागली आहेत.त्यांपैकी बाहर एल् गॅझॅल प्रांतात नॉर्दन बाहर एल् गॅझॅल, वेस्टर्न बाहरएल् गॅझॅल, लेक्स व वरप ही राज्ये इक्वेटोरिया प्रांतात वेस्टर्न, सेंट्रलव ईस्टर्न इक्वेटोरिया राज्ये, तर ग्रेटर अपर नाईल प्रांतात जाँग्लेई, युनिटीव अपर नाईल ही राज्ये आहेत. दहा राज्यांची विभागणी ८६ कौंटींमध्येकरण्यात आली आहे. 

 

सूदानचे राष्ट्राध्यक्ष ओमर अल् बशीर यांनी उत्तर व दक्षिण सूदानअशा दोन्ही देशांच्या दुहेरी नागरिकत्वाला मान्यता देण्याची घोषणा केलीहोती परंतु स्वातंत्र्यानंतर ही घोषणा मागे घेण्यात आली. साउथ सूदानहा संयुक्त राष्ट्रांचा सदस्य आहे. शिलूक व मुर्ले बंडखोरांनी अनेक गावेजाळली आहेत. त्यांनी शेकडो स्त्रिया व मुलींवर अत्याचार केले. असंख्यनागरिकांना ठार केले. तसेच नागरिकांचा क्रू रपणे छळ केला आहे.

आर्थिक स्थिती : साउथ सूदानची अर्थव्यवस्था ही जगातीलसर्वांत कमकुवत व न्यूनविकसित अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. मर्यादितअधःसंरचना, सर्वाधिक मातामृत्यु व स्त्रियांची निरक्षरता ह्या येथीलप्रमुख समस्या आहेत. इतर विकसनशील देशांप्रमाणेच या देशाचीअर्थव्यवस्था ग्रामीण असून निर्वाह कृषीवर आधारित आहे. खनिज तेल, लोह खनिज, तांबे, क्रोमियम, जस्त, टंगस्टन, अभ्रक, चांदी, सोने हीनैसर्गिक संसाधने येथे आहेत. खनिज तेलाच्या बाबतीत हा देश समृद्घआहे. गेल्या काही दशकांपासून खनिज तेल हा येथील अर्थव्यवस्थेचाप्रमुख आधार बनला असून भविष्यकाळातही तोच अर्थव्यवस्थेचा कणाअसणार आहे परंतु जुलै २०११ पासून साउथ सूदान स्वतंत्र झाल्यानंतरखनिज तेलापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे दोन्ही सूदानमध्ये कसे वाटपकरावयाचे यावर अद्याप एकमत झालेले नाही. स्वायत्ततेच्या २००५ ते२०११ या कालावधीत ५० टक्के उत्पादन साउथ सूदानमधील तेलनिर्यातीपासून मिळत असे. तेच तत्त्व पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न आहे.साउथ सूदानमध्ये खनिज तेल साठ्यां चे आधिक्य असून उत्तर सूदानमध्ये खनिजप्रक्रिया केंद्रे आहेत. येथील खनिज तेल उत्पादन क्षेत्रातभारताची मोठी गुंतवणूक आहे. त्याशिवाय किर्लोस्कर, भारत इलेक्ट्रॉनिक्स, बजाज, मारुती सुझूकी, भेल तसेच खाजगी क्षेत्रातील अन्य कंपन्यांचीया देशात गुंतवणूक आहे. येथून इमारती लाकडाची निर्यात आंतरराष्ट्रीयबाजारपेठेत केली जाते.साउथ सूदानमध्ये २४८ किमी. लांबीचे एकेरीअरुंद मापी लोहमार्ग आहेत. जूबा व मॅलॅकॅल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळआहेत. साउथ सूदानी पौंड हे देशाचे चलन आहे. 

अखंड सूदानची जनगणना २००८ मध्ये झाली परंतु साउथ सूदाननेती नाकारली. साउथ सूदानची लोकसंख्या ८२,६०,४९० दाखविलीअसून राष्ट्राध्यक्ष कीर मायार्दित यांनी काही प्रदेशांतील लोकसंख्या कमीकिंवा जास्त दाखविली गेली असण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यांच्यामते सूदानच्या एकूण लोकसंख्येपैकी साउथ सूदानची लोकसंख्या एकतृतीयांश असावी परंतु जनगणनेनुसार प्रत्यक्षात हे प्रमाण २२ टक्के आहे.प्रतिकूल हवामान, वाहतूक व दळणवळण सुविधांचा अभाव, प्रदेशाचीदुर्गमता यांमुळे अनेकांची गणना त्यात केली गेली नाही. तसेच देशत्यागकरून शेजारच्या देशांत गेलेल्या नागरिकांचा विचार त्यात केला गेलानाही. त्यामुळे जनगणनेचे हे आकडे अधिकृत धरता येत नाहीत. जनगणनेचेप्रमुख अमेरिकन तांत्रिक सल्लगार यांच्या मते लोकसंख्येची गणनाकरणारे लोक सु. ८९ टक्के लोकांपर्यंत पोहोचले असावेत. 


साउथ सूदानमध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून उदरनिर्वाहक अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्ययुद्घकाळात तसेच स्वातंत्र्यानंतरच्यायादवी युद्घकाळात या प्रदेशाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंडद्यावे लागले. या काळात कोणत्याही पायाभूत सुविधांचा विकास होऊशकला नाही तसेच मालमत्तेचा बराच विध्वंस झाला. साउथ सूदानप्रदेशालाही याची झळ पोहोचली. येथे अनेक जातीचे लोक राहतात.२०० पेक्षा अधिक वांशिक गटाचे लोक साउथ सूदानमध्ये राहतात. ख्रिश्चन व इस्लाम हे येथील प्रमुख धर्म आहेत तथापि ख्रिश्चन प्रभावअधिक आढळतो. दिनका ही येथील सर्वांत मोठी जमात आहे(लोकसंख्या सु. १ द. ल. पेक्षा अधिक). शिलूक व न्यूअर यायेथील निलोटिक जमाती आहेत. अगदी दक्षिण भागात अमोली व लिटूटूजमातीचे लोक राहतात. 

 

इंग्रजी ही या देशाची अधिकृत भाषा आहे. उत्तर सूदानपेक्षा येथेअधिक भाषा बोलल्या जातात. कोलाक्वील अरेबिक ही मोठ्या प्रमाणावरबोलली जाणारी भाषा आहे. जूबा या राजधानी सभोवतालच्या प्रदेशातजूबा अरेबिक ही मिश्र भाषा बोलली जाते. जूबा टेकड्यांचा परिसर हाआफ्रिकेतील सर्वाधिक भाषिक विविधता असलेला भाग आहे. दिनकाही पश्चिमी निलोटिक भाषा असून ती सर्वाधिक प्रमाणात बोलली जाणारीभाषा आहे. न्यूअर ही दुसरी प्रमुख भाषा आहे. त्याशिवाय पूर्वीयनिलोटिकमधील बारी व ओटूहो, बोंगो-बागिर्मी कुलातील जूर मोडो, ऊबांगीयन कुलातील झांडे या येथील प्रमुख भाषा आहेत. सूदानी युद्घकाळात क्यूबामध्ये निर्वासित म्हणून राहिलेले साउथ सूदानी लोक स्पॅनिशभाषा अस्सखलितपणे बोलतात. या लोकांना क्यूबानोस म्हणून ओळखलेजात असून देशाच्या स्वातंत्र्यानंतर ते जूबामध्ये स्थायिक झाले. 

 

कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ सूदान व युनिव्हर्सिटी ऑफ जूबा हीविद्यापीठे साउथ सूदानमध्ये आहेत. सिटीझन हे येथील सर्वांत मोठेवृत्तपत्र आहे. येथील लोकांची आरोग्यविषयक परिस्थिती विशेषसमाधानकारक नाही. पाच वर्षांखालील बालमृत्युमान दर हजारी ११२असून प्रजोत्पादन कालावधीतील बालमृत्युमान दर हजारी सु. २० आहे. 

 

सन २००४ मध्ये साउथ सूदानमध्ये केवळ तीन शल्यचिकित्सक वतीन रुग्णालये होती. काही प्रदेशांत पाच लाख लोक संख्येमागे एकडॉक्टर असे प्रमाण होते. २० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना दर दिवसांच्यादरडोई एक डॉलरपेक्षा कमी उत्पन्नावर गुजराण करावी लागते. साउथसूदानमध्ये अनेक परंपरागत व आधुनिक खेळ- मुख्यतः कुस्ती व मॉकबॅटल हे खेळ अधिक लोकप्रिय आहेत. याशिवाय बास्केटबॉल, फुटबॉल, सॉर हे खेळही खेळले जातात. (चित्रपत्र).  

चौधरी, वसंत

साऊथ सूदान


राजधानी जूबा : एक दृश्य.मॅलॅकॅल बंदरजूबा येथील सांस्कृतिक कार्यक्रमाचे दृश्यदेशाच्या ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण घरे