शेवरा : [शिलिंद हिं. थाकल, जंगली खजूर इं. ड्वार्फ डेट पाम लॅ. फीनिक्स ॲकॉलिस कुल-ॲ रेकेसी (पामी, पामेसी)]. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक झुडपासारखी दिसणारी लहान शोभिवंत वनस्पती. शेवरा बाह्य हिमालय आणि कुमाऊँपासून पूर्वेकडे खासी व नागा टेकड्या (आसाम), बिहार, ओरिसा, मध्य भारत व दक्षिण भारत या प्रदेशांत १,५०० मी. उंचीपर्यंत आढळतो. म्यानमारमध्येही त्याचा प्रसार आहे.

शेवऱ्याचे कंदधारी खोड जमिनीत सु. १५-२५ सेंमी. व खोडास चिकटून खाली वाढत गेलेला असा असून पहिल्या काही दलांचे पिवळट रंगाच्या काट्यांत रूपांतर झालेले असते. फुलोरे (शाखायुक्त कणिशे) १५-२५ सेंमी. [→ पामी].

शेवऱ्याच्या वृक्षाला सु. २ सेंमी. लांब, लालबुंद ते निळीकाळी मृदुफळे येतात व त्यातील बी लांबट खोबणयुक्त असते. यांच्या कंदातील भेंडापासून साबुदाणा काढतात. तो खाद्य असतो. कळ्या, मुळे व कोवळ्या कंदातील गर औषधी आहे. पानांचा उपयोग चटया, झाडू , दोर, चारा व छपरासाठी केला जातो.

पाटील, शा. दा