ऋषिपंचमी : भाद्रपद शु. पंचमीस स्त्रियांनी करावयाचे एक व्रत. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे षोडशोपचार पूजा करतात. यावरून या दिवसाला’ऋषिपंचमी’हे नाव मिळाले. या दिवशी सकाळी आघाड्याच्या काड्यांनी दंतधावन, नदी अथवा जलाशयावर स्‍नान, कश्यपादी सात ऋषी व अरुंधती यांचे पूजन, वायनदान (वाण देणे), कंदमुळांचा आहार, व्रतकथाश्रवण इ. गोष्टी करावयाच्या असतात. हे व्रत केल्याने रजोदर्शनकाली घडलेले पाप नाहीसे होते, अशी समजूत आहे.

जोशी, रंगनाथशास्त्री