ऊबे : नैर्ऋत्य जपानमधील बंदर व औद्योगिक केंद्र. लोकसंख्या १,५२,९३५ (१९७०). होन्शू प्रांतातील यामागुची जिल्ह्यात हे हीरोशीमापासून १२० किमी. आहे. आसमंतातील कोळशाच्या खाणींमुळे येथे अवजड उद्योगधंदे निर्माण झाले आहेत. याशिवाय येथे कापड, रसायने, सिमेंट, मॅग्नेशियम, इ. उद्योग चालतात. दुसऱ्या महायुद्धात शहराची बरीच हानी झाली.

ओक, द. ह.