उनपदेव : जळगाव जिल्ह्यातील उष्ण पाण्याचे झरे असलेले ठिकाण. लोकसंख्या २०२ (१९६१). अडावदच्या उत्तरेस पाच किमी. वर हे झरे असून त्याचा प्रवाह एका मंदिराच्या चौथऱ्याखालून निघून गोमुखातून बाहेरील कुंडात पडतो. शरभृंग ऋषींना पाण्याची सोय व्हावी म्हणून रामाने या जागी बाण मारून हे उष्णोदकाचे झरे निर्माण केल्याची आख्यायिका आहे. या झऱ्यातील पाण्यात स्‍नान केल्याने रोगमुक्ती होते अशी लोकांची समजूत आहे.

जोशी, चंद्रहास