ईवो : पश्चिम नायजेरियातील एक शेतमालकेंद्र. लोकसंख्या १,८३,९०७ (१९६९ अंदाज). हे ईबादानच्या ४३ किमी. नैर्ऋत्येस आहे. पूर्वीच्या ईवो राज्याची ही राजधानी. टोळीवाल्यांचा राजा अद्यापही पालिकेचा पदसिद्ध अध्यक्ष असून एक चतुर्थांश सभासद टोळीप्रमुखांतून नियुक्त केले जातात. कापड विणणे, कापड रंगविणे, ताडतेल, कोको, अन्नधान्य यांसाठी शहर प्रसिद्ध आहे. 

लिमये, दि. ह.