ईफे : पश्चिम नायजेरियातील उद्योगकेंद्र आणि योरूबा जमातीचे पुरातन व पवित्र शहर. लोकसंख्या १,५०,८१८ (१९६९ अंदाज). हे ईबादानच्या पूर्वेस ८६ किमी. असून याच्या परिसरात सोन्याच्या खाणी, वर्षावने आणि कोकोसमृद्ध प्रदेश आहे. येथे १९६१ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ असून येथील संग्रहालयात योरूबा संस्कृतीचे अवशेष आहेत. ईफे योरूबांच्या धर्मप्रमुखाचे (ओनी) पीठ आहे.

जोशी, चंद्रहास