ईपायरस: एक प्राचीन राज्य. हे वायव्य ग्रीसमध्ये वसलेले असून याच्या पश्चिमेस आयोनियन समुद्र, उत्तरेस इलिरिया, पूर्वेस मॅसिनोडिया व थेसाली आणि दक्षिणेस इटोलिया होते. इलिरियन व डोरियन या जमातींना एकत्र आणून इ. स. पू. चौथ्या शतकात मोलोसीने या राज्याची स्थापना केली. याच्या वंशजांपैकी पिर्हस, (मृत्यू २७२ इ. स. पू.) याने रोमवर अनेक वेळा विजय संपादन केला होता. दुसऱ्या शतकात हे राज्य नष्ट झाले.
जोशी, चंद्रहास